Join us  

घरफोडी प्रकरणी शिक्षिकेला अटक

By admin | Published: May 04, 2016 3:21 AM

महिलांशी मैत्रीचे खोटे नाटक करून त्यांचा विश्वास संपादन करीत ती महिला घराबाहेर पडताच चोरी करणाऱ्या महिलेला महात्मा फुले पोलिसांनी मुद्देमालासाह अटक केली. ही महिला शिक्षिका

कल्याण : महिलांशी मैत्रीचे खोटे नाटक करून त्यांचा विश्वास संपादन करीत ती महिला घराबाहेर पडताच चोरी करणाऱ्या महिलेला महात्मा फुले पोलिसांनी मुद्देमालासाह अटक केली. ही महिला शिक्षिका असल्याचे पोलिस उपायुक्त संजय जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. नीलिमा त्रिवेदरिसंग सोधी (३२,रा.ओम शांती,रामबाग लेन -४) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून २२ तोळे सोन्याचे दागिने आणि आठ हजार असा सुमारे सव्वासात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या आधीही पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याखाली तीन वेळा अटक केली होती.कल्याणयेथील नव इंद्रप्रस्थ सोसायटीत राहणाऱ्या पोर्णिमा भोईर या सायंकाळी बाहेर गेल्या होत्या. त्या घरी परतल्या तेव्हा दरवाजा उघडा दिसला. कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख असा सुमारे सात लाख २५ हजारांचा ऐवज लंपास झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी भोईर यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तेव्हा पोलिसांनी तपास सुरु केला. तेव्हा अशा पद्धतीने फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत या पूर्वीही अशाच घटना घडल्या होत्या. त्याआधारे पोलिसांनी छडा लावत तिला अटक केली. नीलिमाला १० वर्षाचा मुलगा आहे. तिचा पती एका प्यूरीफायर कंपनीत काम करतो. एका शाळेत शिक्षिका म्हणून ती काम करत होती. नोकरी सुटल्यामुळेच तिने घरफोडीचा मार्ग स्वीकारला असावा असा अंदाज पोलीसांचा आहे.