मुंबई : विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणाºया खासगी शिकवणीतील शिक्षकाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. सचिन गुलाब हांडे (४२) असे अटक आरोपीचे नाव आहे.पवईच्या हिरानंदानी परिसरात १३ वर्षीय मुलगी राहते. याच परिसरात असलेल्या हांडेच्या शिकवणीला ती जात होती. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी गेली. तेव्हा हांडेने तिला केबिनमध्ये बोलावून घेतले. तेथे तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने त्याच्या तावडीतून सुटका करत घर गाठले.घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने तिच्यासह थेट पवई पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी विनयभंग आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. गुरुवारी हांडेला अटक केली.हांडे अन्य विद्यार्थिनींना पाहूनदेखील अश्लील शब्द वापरत असल्याचे चौकशीत समोर आले. मात्र, त्याच्याविरुद्ध कोणीही तक्रार दिलेली नाही. या प्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करीत आहेत.
विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 6:10 AM