नोकरीची ऑनलाईन ऑफऱ, शिक्षिकेला गमवावे लागले ८२ हजार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 07:52 AM2021-09-06T07:52:44+5:302021-09-06T07:53:05+5:30

बोरीवली परिसरात राहणाऱ्या ३८ वर्षीय शिक्षिकेने नोकरी डॉट कॉमवर नोकरीसाठी अर्ज केला होता. ३० ऑगस्ट रोजी मनीषा नावाच्या महिलेने फोन करून ‘बायज्यूस’ या ऑनलाइन क्लासेसमध्ये शिक्षिका म्हणून निवड झाल्याचे सांगितले.

The teacher had to lose Rs 82,000 for the job pdc | नोकरीची ऑनलाईन ऑफऱ, शिक्षिकेला गमवावे लागले ८२ हजार

नोकरीची ऑनलाईन ऑफऱ, शिक्षिकेला गमवावे लागले ८२ हजार

Next
ठळक मुद्देबोरीवली परिसरात राहणाऱ्या ३८ वर्षीय शिक्षिकेने नोकरी डॉट कॉमवर नोकरीसाठी अर्ज केला होता. ३० ऑगस्ट रोजी मनीषा नावाच्या महिलेने फोन करून ‘बायज्यूस’ या ऑनलाइन क्लासेसमध्ये शिक्षिका म्हणून निवड झाल्याचे सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या शिक्षिकेला बायज्यूस या ऑनलाइन क्लासेसच्या नावाने नोकरीसाठी फोन आला. पुढे याच नोकरीसाठी त्यांना ८२ हजार रुपये गमवावे लागले. याप्रकरणी बोरीवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

बोरीवली परिसरात राहणाऱ्या ३८ वर्षीय शिक्षिकेने नोकरी डॉट कॉमवर नोकरीसाठी अर्ज केला होता. ३० ऑगस्ट रोजी मनीषा नावाच्या महिलेने फोन करून ‘बायज्यूस’ या ऑनलाइन क्लासेसमध्ये शिक्षिका म्हणून निवड झाल्याचे सांगितले. अर्ज पुढे पाठविण्यासाठी १९०० रुपये भरण्यास सांगितले. त्यांनीही विश्वास ठेवून पैसे भरले. पुढे नोकरीसाठी विविध कारणे देत ८२ हजार रुपये उकळले. आणखी पैशांची मागणी होताच त्यांना संशय आला. त्यांनी व्यवहार थांबवला. पैसे परत देण्यास सांगताच संबंधित महिला नॉट रिचेबल झाली. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शनिवारी त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

ऑनलाइन नोकरी पडतेय महागात
कोरोनाच्या काळात अनेकांवर बेरोजगारी ओढवली. याचाच फायदा घेत ठग नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक करत आहेत. त्यामुळे अशा ठगांपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे. कुठलाही व्यवहार करण्यापूर्वी त्याची अधिकृतता पडताळून बघा असेही आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

 

Web Title: The teacher had to lose Rs 82,000 for the job pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.