Join us

शिक्षक जपतो वाचन संस्कृतीचा अनोखा उपक्रम; २० वर्षांत ६ हजार ५०० पुस्तके दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 5:11 AM

पुस्तकामुळे ज्ञान, माहिती, शिक्षण, मनोरंजन, उपदेश सर्व काही मिळू शकते.

- मनोहर कुंभेजकर मुंबई : जोगेश्वरी-गोरेगाव विभागातील सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी एक अनोखा उपक्रम बऱ्याच वर्षांपासून सुरू केला आहे. विविध सण, समारंभ, उत्सवाच्या काळात ते ज्यांना ज्यांना भेटतात तसेच त्यांच्या घरी जे जे लोक त्यांना भेटायला येतात तेव्हा ते त्यांना न चुकता एखादे पुस्तक भेट म्हणून देतात. हा उपक्रम त्यांनी मागील वीस वर्षांपासून जोपासला असून, आजतागायत जवळजवळ ६ हजार ५०० पेक्षा अधिक लोकांना त्यानी पुस्तके भेट दिली आहेत.ग्रंथाचे स्थान मानवी जीवनात मित्र, मार्गदर्शक, गुरू अशा व्यापक प्रमाणावर आहे. पुस्तकामुळे ज्ञान, माहिती, शिक्षण, मनोरंजन, उपदेश सर्व काही मिळू शकते. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. या युगात वाचन ही एक गरज बनलेली आहे. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात वाचायला वेळच मिळत नाही हे अनेकांकडून ऐकावयास मिळते. म्हणूनच आपल्या दिनचर्येमध्ये नियमित गरजेच्या अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींबरोबरच वाचनाची सवय प्रयत्नपूर्वक लावून घेणे गरजेचे आहे. नाही तर आपली अवस्था भवसागरात हेलकावत असलेल्या माणसासारखी होईल. या भरकटलेल्या माणसाला इछित स्थळी नेणारे जहाज म्हणजे ग्रंथ, असे वाचनाचे महत्त्व सांगताना हेलन केलर म्हणाली होती. हे महत्त्व अधोरेखित करत गणेश हिरवे यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.ग्रंथाचे स्थान मानवी जीवनात मित्र, मार्गदर्शक, गुरू अशा व्यापक प्रमाणावर आहे. पुस्तकामुळे ज्ञान, माहिती, शिक्षण, मनोरंजन, उपदेश सर्व काही मिळू शकते. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. या युगात वाचन ही एक गरज बनलेली आहे.

टॅग्स :मुंबई