शिक्षक अन् शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक, शाळांसाठी नियमावली जारी

By महेश गलांडे | Published: November 10, 2020 07:42 PM2020-11-10T19:42:37+5:302020-11-10T19:46:22+5:30

शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे दिवाळी सुटीनंतर शाळा सुरू होणार हे निश्चित झाले आहे. परंतू जिल्हा परिषद शिक्षण विभागाला अद्याप शासन आदेशाची प्रतीक्षा आहे.

Teachers and non-teaching staff will be tested before the school starts, SOP for school in fron of covid in maharashtra | शिक्षक अन् शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक, शाळांसाठी नियमावली जारी

शिक्षक अन् शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक, शाळांसाठी नियमावली जारी

Next
ठळक मुद्देशाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे दिवाळी सुटीनंतर शाळा सुरू होणार हे निश्चित झाले आहे. परंतू जिल्हा परिषद शिक्षण विभागाला अद्याप शासन आदेशाची प्रतीक्षा आहे

मुंबई - विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार केली आहेत ती बंद करता येणार नाहीत. अशा शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का, याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची तपासणी यांसारख्या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार आता शिक्षण विभागाने नियमावली जाहीर केली आहे. 

शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे दिवाळी सुटीनंतर शाळा सुरू होणार हे निश्चित झाले आहे. परंतू जिल्हा परिषद शिक्षण विभागाला अद्याप शासन आदेशाची प्रतीक्षा आहे. सुरक्षीततेची योग्य काळजी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे, निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले आहेत. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबतच्या हालचाली  काही जिल्हामध्ये सुरू झाल्या आहेत. आता यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये शाळा सुरू करण्यासाठीची सर्व नियमावली देण्यात आली आहे. त्यानुसार, शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. 

शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय

शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणविषयक सुविधा सुनिश्चित करणे. शाळेत क्वारंटाइन सेंटर असेल तर स्थानिक प्रशासनाने ते इतरत्र हलवणे. ते तेथून इतरत्र हलवणे शक्य नसेल तर शाळा इतरत्र किंवा खुल्या परिसरात भरवावी.
- शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 17 ते 22 नोव्हेंबर २०२० यादरम्यान RTPCR चाचणी करणे बंधनकारक असेल.
- जे शिक्षक कोविड-19 पॉझिटिव्ह असतील त्यांनी डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतरच शाळेत उपस्थित राहावे.
- आपत्कालीन, स्वच्छता पर्यवेक्षण आदी विविध कामांसाठी कार्यगट स्थापन करणे.
- सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल अशा प्रकारची बैठक व्यवस्था करावी. एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे व्यवस्था असावी.
- सोशल डिस्टन्सिंग नियमांच्या अंमलबजावणीसाठी विविध चिन्हे, खुणांचा वापर करणे.
- शाळेत स्नेह संमेलन, क्रीड वा अन्य तत्सम गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित करू नयेत. शिक्षक-पालक बैठका ऑनलाइन घ्याव्यात.
- विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती आवश्यक असेल.

विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल.
- कोविड-19 विषयक जनजागृती करणे.

शाळा सुरू झाल्यानंतर 

- शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा.
- शाळेतील वर्गखोल्या, बाहेरील नेहमी स्पर्श होणारे भाग, अध्ययन साहित्य, डेस्क, खुर्च्या आदी वारंवार निर्जंतुक कराव्यात.
- हात धुण्याच्या ठिकाणी साबण, हँडवॉश आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी. अल्कोहोलमिश्रित हँड सॅनिटायझर सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात यावे.
- स्वच्छतागृहे वारंवार निर्जंतुक करावीत.
-विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतरांचे दररोज थर्मल स्क्रिनींग करावे.
- विद्यार्थी एक दिवसाआड शाळेत उपस्थित राहतील. म्हणजेच 50 टक्के विद्यार्थी शाळेत तर 50 टक्के विद्यार्थी ऑनलाइन वर्गांना उपस्थित राहतील.
- गणित, विज्ञान, इंग्रजीसारखे कोअर विषय शाळेत तर अन्य विषय ऑनलाइन शिकवावेत.
-ऑनलाइन आणि ऑफलाइनचे वेळापत्रक तयार करावे.
 

Web Title: Teachers and non-teaching staff will be tested before the school starts, SOP for school in fron of covid in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.