फाटक्या चपलांमुळे सराईत बॅग लिफ्टर गजाआड !
By admin | Published: November 26, 2014 12:58 AM2014-11-26T00:58:51+5:302014-11-26T00:58:51+5:30
हातात व्हीआयपी बॅग, मात्र पायातील फाटक्या चपलांमुळे एका सराईत बॅग लिफ्टरला पकडण्यात रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांना यश आले.
Next
मनीषा म्हात्रे ल्ल मुंबई
हातात व्हीआयपी बॅग, मात्र पायातील फाटक्या चपलांमुळे एका सराईत बॅग लिफ्टरला पकडण्यात रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांना यश आले. शफिक ऊर्फ रफिक सनाप सलीम शेख (27) असे आरोपी तरुणाचे नाव असून, बॅगचोरीच्या गुन्ह्यात त्याला नुकतीच अटक करण्यात आली.
सीएसटीहून सुटणा:या सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये दुपारी 2 वाजून 55 मिनिटांनी जनरल डब्याचे तिकीट काढून शेख चढला. त्याचदरम्यान झवेरी बाजारातील एका व्यापा:याच्या सीटखालील बॅगेकडे त्याची नजर गेली. हाती मोठे घबाड लागताच संधी साधत त्याने बॅग लंपास केली. आपलीच बॅग असल्याचे भासवून तो तेथून निसटला आणि मागेपुढे न बघता चालू लागला. त्याचदरम्यान सीएसटी स्थानकातील फलाट क्रमांक 18 वर साध्या गणवेशात फिरत असलेल्या रेल्वे आरपीएफच्या दोन हवालदारांची नजर त्याच्यावर पडली. अंगावरील मळकट कपडे, त्यात पायातील फाटक्या चपला अशात हातात पॉश बॅग घेऊन जाणा:या शेखबाबत पोलिसांचा संशय बळावला. अधिका:याने त्याच्याकडे बॅग कुणाची याबाबत विचारपूस केली.
भांडा फुटल्याच्या भीतीने बॉस की बॅग हैं, देने जा रहा हँू, असे सांगून त्याने पोलिसांना गंडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्याकडे मालकाचा फोन नंबर मागितला असता, त्याने शक्कल लढवून बंद क्रमांक पोलिसांना दिला. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीन बळावला.
अखेर शेखला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने ही बॅग चोरल्याची कबुली दिली आणि फक्त फाटक्या चपलामुळे हा सराईत चोर रेल्वे पोलिसांच्या हाती लागला. बॅगमध्ये तपासणी केली असता
बॅगेतील एका डायरीच्या आधारे पोलीस बॅग मालकार्पयत पोहोचले. ही बॅग झवेरी बाजारातील व्यापारी श्रीराम वल्लभ भवर (55) यांची असून, यामध्ये 9 हजार 5क्क् रुपयांची रोकड आणि काही महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांना सापडली. मुळात बॅगचोरी झाल्याचे भवर यांना पोलिसांचा
कॉल आल्यावर समजले. त्यांनी ताबडतोब रेल्वे पोलिसांकडे धाव घेऊन बॅग ताब्यात घेत पोलिसांचे आभार मानले.
शेख हा अभिलेखावरील आरोपी
शेख मस्जीद येथील टाटानगर परिसरातील झोपडपट्टीमध्ये राहण्यास आहे. तो अभिलेखावरील आरोपी असून चोरीप्रकरणी त्याच्यावर रेल्वे पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.