मुंबईतील १० लाख परवडणाऱ्या गृहप्रकल्पामध्ये शिक्षकांना घरे द्या, शिक्षक परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 02:39 PM2018-04-26T14:39:01+5:302018-04-26T14:39:01+5:30

मुंबई शहर व उपनगरांमध्ये १० लाख परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीमध्ये मुंबईत भाड्याने राहणाऱ्या व घर नसणाऱ्या शिक्षकांना प्राधान्याने घरे द्यावीत, अशी मागणी शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

Teachers give homework to teachers in 10 million affordable home-care centers in Mumbai, demand for teachers' conference chief | मुंबईतील १० लाख परवडणाऱ्या गृहप्रकल्पामध्ये शिक्षकांना घरे द्या, शिक्षक परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबईतील १० लाख परवडणाऱ्या गृहप्रकल्पामध्ये शिक्षकांना घरे द्या, शिक्षक परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

googlenewsNext

मुंबई : मुंबई शहर व उपनगरांमध्ये १० लाख परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीमध्ये मुंबईत भाड्याने राहणाऱ्या व घर नसणाऱ्या शिक्षकांना प्राधान्याने घरे द्यावीत, अशी मागणी शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुंबई शहर व उपनगरातील "ना विकास क्षेत्रातील जमीन" परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली बांधकामासाठी खुली करण्याचा निर्णय राज्य शासनाने काल घेतला असून यामध्ये १० लाख घरे बांधली जाणार आहेत.
वाढती महागाई व मुंबईत घरांच्या किंमतीत झालेली प्रचंड वाढ यामुळे मुंबईत नोकरी करणाऱ्या शिक्षकांना व सरकारी कर्मचाऱ्यांना मुंबईत घरे घेणे शक्य नसल्याने शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने मुंबईबाहेर राहत आहे. वसई, विरार, नवी मुंबई, ठाणे, कल्याण व डोंबिवली येथून रोज प्रवासाची दगदग सहन करीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लोकलने अपडाऊन करतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे रोज सरासरी ४ तास प्रवासात जातात. यामुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ वाया जात असल्याचे सांगून शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांना मुंबईत घरे आवश्यक असल्याचे अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Web Title: Teachers give homework to teachers in 10 million affordable home-care centers in Mumbai, demand for teachers' conference chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर