मुंबई: टीईटी परीक्षा होऊन दोन महिने उलटून गेल्यावरसुद्धा परीक्षेचे पर्यवेक्षण करणाऱ्या मुंबईतील शिक्षकांना मानधन मिळत नव्हते. अखेर आज अनिल बोरनारे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मानधनाची रक्कम अदा करण्यात आली. मुंबईतील शिक्षकांनी याबाबत अनिल बोरनारे यांच्याकडे तक्रार केली होती. बोरनारे यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अधिकारी व शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडे याबाबत पाठपुरावा केला. त्यानुसार आज शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागातील टीईटी परीक्षा केंद्र असलेल्या मुख्याध्यापकांना शिक्षण निरीक्षक कार्यालयातून मानधन घेऊन जाण्याचे आदेश गेले व शाळेतील केंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मंजूर केलेली रक्कम शाळांकडे सुपूर्द केली गेली. दोन दिवसांपूर्वी मानधनाची रक्कम अदा न झाल्यास जानेवारीत होणाऱ्या टीईटी परिक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा अनिल बोरनारे यांनी दिला होता.
११ वी ऑनलाईन शुल्काची शाळांची थकबाकीही मिळालीमुंबईतील शाळांना देय असलेली ११ वी ऑनलाईन प्रक्रियेतील शुल्काची रक्कम वर्ष उलटून गेल्यावरही मिळाली नव्हती. अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालकांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे शाळेचा नेट चार्ज, प्रिंटर्स, मदतनीस टेक्निशियन व स्टेशनरी यासाठी प्रती विद्यार्थी दिली जाणारी रक्कमही शाळांना देण्यात आली.