मनोहर कुंभेजकर, मुंबई : गोरेगाव पश्चिम, सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, जवाहर नगर येथे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्रातील शिक्षक संवाद मेळावा पार पडला. दिंडोशी गोरेगाव- जोगेश्वरी- अंधेरी परिसरातील ३०० शिक्षक सदर मेळाव्याला उपस्थित होते.
यावेळी शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर म्हणाले की, लोकशाहीला धोका निर्माण करणाऱ्या शक्ती डोके वर काढीत असून भारतीय राज्य घटनेत बदल करण्याच्या दिशेने या शक्ती पाऊले टाकीत आहेत. त्यामुळे शिक्षकां सारख्या बुध्दीवादी नागरिकांनी लोकशाहीच्या संरक्षणार्थ येत्या दि,20 मेला गावी न जाता,मतदान करा आणि लोकशाही बळकट करा असे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले.
यावेळी गोरेगाव विधानसभा संघटक व माजी सिनेट सदस्य समीर देसाई यांनी नमूद केले की, सत्ताधारी पक्ष जातीधर्माचे राजकारण करून आपल्या देशातील लोकशाही मोडकळीस आणण्याचे प्रयत्न करीत आहे. शिक्षकांनी या परिस्थितीत मोठ्या संख्यने मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस प्रकाश शेळके, उपाध्यक्ष सलीम शेख, राज्य समन्वयक नितीन चौधरी, विधी सल्लागार मछिंद्र खरात, मुंबई विभाग अध्यक्ष अजित चव्हाण, महिला आघाडी अध्यक्षा सौ. मानसी चाळके, महिला मुंबई समन्वयक शबाना ठाकुर, कोषाध्यक्ष भरत म्हात्रे, सरचिटणीस मुरलीधर मोरे, संजय धुरी, संतोष ताम्हणकर ,पश्चिम मुंबई विभागाचे अध्यक्ष हितेंद्र चौधरी,शिक्षक सेनेचे अन्य पदाधिकारी,तसेच अनेक मुख्याध्यापक,व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.