तंबाखू मुक्तीसाठी शिक्षक करणार विद्यार्थ्यांना समुपदेशन; हिलीसचा 'तंबाखू मुक्त शिक्षक-तंबाखू मुक्त समाज' कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 08:00 PM2024-01-24T20:00:27+5:302024-01-24T20:00:36+5:30
हिलीस सेखसरिया इन्स्टिट्युट फॉर पब्लिक हेल्थ यांनी बिहार शिक्षण विभागासोबत तंबाखूमुक्त शिक्षक – तंबाखू मुक्त समाज कार्यक्रम यशवस्वी केला.
- श्रीकांत जाधव
मुंबई : देशात तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाशी संबंधित मृत्यूचा दर हा दररोज ३७०० व्यक्ती इतका आहे. महाराष्ट्रात तर संपूर्ण लोकसंख्येच्या २७ टक्के लोकसंख्या ही तंबाखू सेवनाने होणार्या समस्यांनी त्रस्त आहे. तेव्हा शाळेपासून विद्यार्थ्यांना तंबाखू व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी 'तंबाखू मुक्त शिक्षक – तंबाखू मुक्त समाज' या नाविन्यपूर्ण कार्यक्रम हिलीस सेखसरिया इन्स्टिट्युट फॉर पब्लिक हेल्थ राबविणार आहे. शाळेच्या १०० यार्डात तंबाखू विक्री होत असल्यास तक्रार करा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना यावेळी केले.
हिलीस सेखसरिया इन्स्टिट्युट फॉर पब्लिक हेल्थ यांनी बिहार शिक्षण विभागासोबत तंबाखूमुक्त शिक्षक – तंबाखू मुक्त समाज कार्यक्रम यशवस्वी केला. ५० टक्के शिक्षकांनी तंबाखूपासून मुक्ती मिळवली तर ९२ टक्के शाळांनी तंबाखूमुक्त शाळेची यशस्वी अंमलबजावणी केली. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्याबाबत बुधवारी पत्रकार संघात हिलीसचे संचालक डॉ. प्रकाश गुप्ता, डॉ. मंगेश पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यावर तंबाखूच्या दुष्परिणामांची गडद छाया असून अंदाजे २७ टक्के जनतेला तंबाखू सेवना मुळे समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक आरोग्यावर होणारा हा घातक परिणाम पाहून नाविन्यपूर्ण उपायांची गरज म्हणून हिलीस हा उपक्रम हाती घेत असल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले. तर उपक्रमानुसार तयार केलेले स्वयं-मदत पुस्तिकेच्या माध्यमातून शाळांमधील प्रमुखांना तंबाखूच्या वापरापासून मुक्ती मिळवण्यासाठी शाळांमध्ये तंबाखू मुक्त शाळांचे वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण, तंबाखू थांबवण्यासाठी सहकार्य, तंबाखूमुक्त शाळांसाठी योजना असे सहकार्य केले जाणार आहे.