Join us

४० परिचारिकांची तुकडी संरक्षण सेवेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 4:07 AM

मुंबई : चार वर्षांच्या यशस्वी पदवी अभ्यासक्रमानंतर ४० परिचारिका (नर्सेस)ची तुकडी गुरुवारी मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसमध्ये दाखल झाली. नर्सिंग महाविद्यालयाच्या ...

मुंबई : चार वर्षांच्या यशस्वी पदवी अभ्यासक्रमानंतर ४० परिचारिका (नर्सेस)ची तुकडी गुरुवारी मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसमध्ये दाखल झाली. नर्सिंग महाविद्यालयाच्या बी. एस. सरसो. नर्सिंगच्या सातव्या तुकडीचा लष्करी सेवेतील समावेशाचा औपचारिक सोहळा ‘आयएनएचएस अश्विनी’ येथे पार पडला. ‘आयएनएचएस अश्विनी’च्या कमांडिग ऑफिसर रिअर ॲडमिरल आरती सरिन यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ब्रिगेडियर ओमना कुरीकोसे यांनी या अधिकाऱ्यांना नर्सिंग सेवेची शपथ दिली, तर आरती धरून यांच्या हस्ते प्रशिक्षणात अव्वल आणि विशेष प्राविण्य दाखवलेल्या परिचारिकांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लेफ्टनंट सी. आंग्मो यांना ८६.६६ टक्के गुणांनी अव्वल आल्याबद्दल ‘डीजीएमएस फिरता चषक’ आणि ‘पुष्पांच्या मलिक चषक’ प्रदान करण्यात आले. तर लेफ्टनंट अलिना डेविस यांना तुकडीतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी ‘अश्विनी पदक’ने सन्मानित करण्यात आले. लेफ्टनंट कीर्ती शुक्ला यांना ‘पद्मा कृष्णा फिरता चषक’ प्रदान करण्यात आला.

या नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना २०१० साली करण्यात आली होती. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, नाशिकशी संलग्न असलेल्या या नर्सिंग महाविद्यालयामध्ये चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आणि एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम शिकवला जातो.