मेट्रोच्या चाचण्यांसाठी टीम सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:05 AM2021-01-09T04:05:17+5:302021-01-09T04:05:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मेट्रोच्या ट्रायल रन सुरू करण्यासाठी टीम आता सज्ज होत असतानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश ...

Team ready for Metro tests | मेट्रोच्या चाचण्यांसाठी टीम सज्ज

मेट्रोच्या चाचण्यांसाठी टीम सज्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मेट्रोच्या ट्रायल रन सुरू करण्यासाठी टीम आता सज्ज होत असतानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी पाहणी दौरे वाढविले आहेत. येथील कामकाज सुरळीत सुरू असून ते निर्धारित वेळेत पूर्ण होईल याची ते या दौऱ्यातून खात्री करत आहेत. चारकोप मेट्रो डेपो आणि लाइन २ आणि ७ येथील कामांना ते सतत भेटी देत आहेत. तर पहिली मेट्रो ट्रेन ट्रायलसाठी मुंबईत लवकर येत असून, रोलिंग स्टॉक टीम सज्ज होत असून, त्यांना हैदराबाद येथे प्रशिक्षण दिले जात आहे.

महानगर आयुक्त डी.के. शर्मा यांनीदेखील प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीविषयी सविस्तर माहिती घेतली असून, कामाचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठका सुरू आहेत, असे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. तत्पूर्वी मुंबई इन मिनिट्सचे स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेल्याचा दावा प्राधिकरण करत आहे. त्यानुसार, मेट्रो-२ अ वर ५८.८६ टन वजनाचे एक स्टील गर्डर उभारण्यात आले आहे. तर पोईसर नदीच्या येथे ७५ मीटरचा स्टील स्पॅन बसविण्यात आला आहे. मेट्रो-२ अ डिसेंबरपर्यंत सुरू होणार होती. मात्र कोरोनामुळे या प्रकल्पास विलंब होत आहे. दरम्यान, दहिसर ते डी.एन. नगर असा मेट्रो २ अ मुळे प्रवासाची वेळ ५० टक्के वाचणार आहे.

Web Title: Team ready for Metro tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.