व्यथा मांडताना अश्रूंचा बांध फुटला..

By admin | Published: September 12, 2016 03:34 AM2016-09-12T03:34:15+5:302016-09-12T03:34:15+5:30

औषधांच्या रिअ‍ॅक्शनमुळे अवघ्या पस्तीशीतील मुलगा अचानक बेशुद्ध पडला. या प्रकाराने भांबाऊन गेलेल्या त्याच्या आईने त्याला कसेबसे शेजाऱ्यांच्या मदतीने गोरेगावच्या

Tears of the tears broke out while presenting sadness. | व्यथा मांडताना अश्रूंचा बांध फुटला..

व्यथा मांडताना अश्रूंचा बांध फुटला..

Next

गौरी टेंबकर - कलगुटकर , मुंबई
औषधांच्या रिअ‍ॅक्शनमुळे अवघ्या पस्तीशीतील मुलगा अचानक बेशुद्ध पडला. या प्रकाराने भांबाऊन गेलेल्या त्याच्या आईने त्याला कसेबसे शेजाऱ्यांच्या मदतीने गोरेगावच्या शताब्दी रुग्णालयापर्यंत नेले. मात्र तिथे त्याला दाखल करूनच घेतले नाही. त्यामुळे रुग्णवाहिकेतून दुसऱ्या रुग्णालयात नेताना आपला मुलगा वाचणे अवघड असल्याचा विचार मनात येत होता, हे सांगताना गोरेगावच्या मीरा वाकोडे यांनी भरसभेत ढसाढसा रडायला सुरवात केली. शेजाऱ्यांनी धावपळ करत मुलाला वाचविले नसते तर आज काय झाले असते या विचारानेच त्यांना ग्लानी येते. करोडो रुपये खर्चून सामान्यांच्या सोईसाठी असलेल्या सिद्धार्थ रुग्णालयाने त्यांच्यासाठी तसेच त्यांच्यासारख्या अनेक लोकांसाठी ‘नॉट अव्हेलेबल’ ची भूमिका घेतली आहे. अशाच अनेक स्थानिक समस्यांचा आढावा गोरेगावच्या त्रिकोणी मैदानाजवळ आयोजित ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमात घेण्यात आला.
या कार्यक्रमात गोरेगावकरांनी स्वत:च्या समस्या मांडत स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवक, पालिका आणि पोलीस प्रशासनाबाबतची त्यांची नाराजी व्यक्त केली. लोकसेवा प्रतिष्ठानचे प्रमुख दीपक जाधव यांच्या पुढाकाराने
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘वोट दो और खड्डे मे जाओ’
‘पाच साल पहले माँ, बहनों वोट दो’, ऐसी बिनती करते हुए ये नगरसेवक दरवाजेपर हाथ पसरे आये थे’, और अब नल मे पानी नही, रस्ते मे गड्डे है जिसके बारे मै शिकायत करो तो पहचानते नही, इसलिये अब ‘वोट दो, खड्डे मे जाओ, अशी भूमिका
स्थानिक नगरसेवकांनी घ्यावी, जेणेकरून लोक खोट्या आशेवर तरी राहणार नाहीत असा सल्ला ८२ वर्षांच्या भगतसिंग नगरच्या रहिवासी शारदादेवी यांनी देत ‘क्या फायदा वोट देने का’?असा सवाल केला
आहे.

फॉगिंग सुरू केले पण...
गोरेगावमध्ये डास आणि मच्छरांचा त्रास असल्याचे येथील स्थानिक मल्हारी भिसे यांनी याआधी आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत आपल्या दारी’ मध्ये सांगितले. त्याची तक्रार ‘लोकमत’ ने रात्री डास, दिवस माशा या मथळयाखाली छापली. या वृत्ताने जागे झालेल्या पालिका प्रशासनाने येथे अनेक ठिकाणी फॉगिंग सुरु केले. मात्र डासांचा त्रास हा सायंकाळी सात ते नऊच्या सुमारास होतो. त्यामुळे दिवसा फॉगिंग करण्यापेक्षा रात्रीच्या वेळी जर करण्यात आली तर ते अधिक उपयोगी ठरेल, अशी विनंती भिसे यांनी केली.
टॉवरमुळे रेडिएशनचा धोका
गोरेगावात चुकीच्या जागी म्हणजे सिद्धार्थ रुग्णालयाच्या ५० फूट अंतरावर रिलायंसचा टॉवर रातोरात उभा केला. याप्रकरणी आम्ही पालिकेचे सहाय्यक आयुक्तांची भेट घेतली. तेव्हा आम्ही संबंधितांना तीन महिन्यांची नोटीस दिल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावर अद्याप काही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यानुसार आम्ही पुन्हा जाऊन भेटलो तेव्हा त्यांनी भाषा बदलली. आता सर्व काही अधिकृत झालेले आहे. मी काहीही करू शकत नाही, असे उत्तर त्यांनी दिले. मात्र या टॉवरमधून निघणारे बाराशे वॅट रेडिएशन दमा, कॅन्सरसारख्या आजारांना करणीभूत ठरणार आहेत.
तसेच लहान मुले आणि गरोदर महिलांना याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत, त्यामुळे आम्ही या टॉवरचा अखेरपर्यंत विरोध करत राहू, असे मोतीलाल नगरमध्ये राहणारे श्रीधर शेलार यांनी सांगितले.

Web Title: Tears of the tears broke out while presenting sadness.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.