आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोबोवॉर, फुल थ्रोटलसाठी टेकफेस्ट सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 03:15 AM2019-12-28T03:15:35+5:302019-12-28T03:16:02+5:30

वैज्ञानिकांनी केलेल्या प्रगतीचे सादरीकरण : ४० हून अधिक देशांतील ३०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग

TechFest ready for full throttle, internationally roboover | आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोबोवॉर, फुल थ्रोटलसाठी टेकफेस्ट सज्ज

आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोबोवॉर, फुल थ्रोटलसाठी टेकफेस्ट सज्ज

Next

मुंबई : जगात आणि देशात विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये वैज्ञानिकांनी केलेल्या प्रगतीचे सादरीकरण आयआयटी टेकफेस्टमध्ये करण्यात येते. विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन नागरिकांपर्यंत पोहोचावे व त्याला प्रसिद्धी मिळावी यासाठी आयआयटीच्या टेकफेस्टमधून विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते.

टेकफेस्टमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील, विविध देशांतील स्पर्धक टेकफेस्टमधील आयोजित स्पर्धांमध्ये आपले नवीन संशोधन व तंत्रज्ञान सादर करतात. यंदाही ४० हून अधिक देशांतील ३०० हून अधिक स्पर्धकांनी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आणि कार्यक्रमांसाठी टेकफेस्टमध्ये आपापली नोंदणी केली आहे. आंतरराष्ट्रीय सहभागासाठी टेकफेस्टमार्फत नेपाळ, मादागास्कर, बांगलादेश यांसारख्या देशांतही स्पर्धांचे झोनल राउंड्स घेण्यात आले होते, ज्यामध्ये ४०० हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता. आंतरराष्ट्रीय रोबोवॉर, आंतरराष्ट्रीय फुल थ्रोटल तसेच आंतरराष्ट्रीय मायक्रोमाऊस चॅलेंज या स्पर्धा टेकफेस्टमधील विशेष आकर्षण ठरत आहेत.
सगळ्यांच्याच आकर्षणाचा बिंदू ठरणारी स्पर्धा म्हणजे आंतरराष्ट्रीय रोबोवॉर. १० लाखांचे बक्षीस असणाऱ्या या स्पर्धेला रोबोवॉरमधील जगातील उत्कृष्ट स्पर्धक टेकफेस्टमध्ये सहभागी होतात. यंदाही यूएसए, यूके, चायना, ब्राझील, मलेशिया, फिलिपाइन्स, नेपाळ, भूतान, बांगलादेशसारख्या देशांनी रोबोवॉरसाठी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले आहेत.
अतिशय लहान रोबोटिक माउस अत्यंत क्लिष्ट अशा चक्रव्यूहातून फिरवून शेवटापर्यंत आणण्याची स्पर्धा म्हणजे मायक्रोमाउस चॅलेंज. या स्पर्धेलाही विद्यार्थी प्रचंड प्रतिसाद देत आहेत. आॅस्ट्रेलिया, चायना, ट्युनिशियासारखे देश या स्पर्धेच्या २.२५ लाखांच्या बक्षिसासाठी एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत. अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागामुळे निश्चितच टेकफेस्टची ओळख मुंबईसाठी मर्यादित न राहता जगात या स्पर्धांचा डंका वाजणार असल्याची अपेक्षा आयोजकांची आहे.

रेसिंग स्पर्धेची क्रेझ जास्त
रिमोटच्या साहाय्याने कंट्रोल केल्या जाणाºया गाड्यांची रेसिंग कॉम्पिटिशन म्हणजे तंत्रवेड्या तरुणांसाठी चित्तथरारक अनुभव असतो. देशातील ५० हून अधिक रेसिंग गाड्यांच्या ड्रायव्हर्सचा स्पर्धेत सहभाग असून आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्रान्स, यूके, आॅस्ट्रेलियासारख्या देशांतून स्पर्धक सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे बक्षीस रुपये १.३ लाख इतके असून कार मॉडेलच्या रोमांचक रेससाठी स्पर्धकांची जय्यत तयारी सुरू आहे.
 

Web Title: TechFest ready for full throttle, internationally roboover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.