मुंबई - करीरोड-परळ दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वाहतूक 15 मिनिटे उशिराने सुरू होईल. तर धीमी वाहतूक जलद मार्गावरुन वळविण्यात आली आहे. टीटवाळा-सीएसएमटी लोकलमध्ये हा बिघाड झाला आहे.
मध्ये रेल्वे मार्गावर सकाळीच लोकलमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. ऑफिस कामासाठी घरातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना लोकल बिघाडामुळे कामावार पोहोचण्यास उशीर होणार आहे. करीरोड-परळ मार्गावर हा बिघाड झाला असून रेल्वे प्रशासनाकडून तातडीने याची दखल घेण्यात आली आहे. तसेच धीमी वाहतूकही जलद मार्गावरुन वळविण्यात आली आहे. दरम्यान, लवकरच हा बिघाड दुरूस्त होऊन वाहतूक पूर्वपदावर येईल, असे समजते.