Join us

कोविन ॲपमध्ये तांत्रिक बिघाड; लसीकरण दोन दिवस स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविन ॲपमध्ये संध्याकाळी उशिरा तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने मुंबई महापालिकेला लसीकरण मोहीम अर्ध्यावरच थांबवावी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोविन ॲपमध्ये संध्याकाळी उशिरा तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने मुंबई महापालिकेला लसीकरण मोहीम अर्ध्यावरच थांबवावी लागली आहे. त्यामुळे ही समस्या दूर होईपर्यंत १७ आणि १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस लसीकरण स्थगित करण्यात आले असल्याचे पालिका प्रशासनाने रात्री उशिरा जाहीर केले.

कोविड लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. शनिवारी तांत्रिक अडचण आल्याने ऑफलाइन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती. यापुढील सर्व नोंदी ॲपद्वारेच करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार मुंबईत रविवार १७ जानेवारी आणि सोमवार १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस कोविड १९ लसीकरण स्थगित ठेवण्यात येणार आहे. कोविन ॲप पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.