कोविन ॲपमध्ये तांत्रिक समस्या कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:08 AM2021-01-21T04:08:10+5:302021-01-21T04:08:10+5:30
कोविन ॲपमध्ये तांत्रिक समस्या कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यापूर्वी ॲपमध्ये तांत्रिक समस्या असल्याचे आढळून आल्याने लसीकरणाला ...
कोविन ॲपमध्ये तांत्रिक समस्या कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यापूर्वी ॲपमध्ये तांत्रिक समस्या असल्याचे आढळून आल्याने लसीकरणाला स्थगिती देण्यात आली होती. मुंबईत पहिल्या दिवशी पालिका प्रशासनाचे चार हजार लसीकरणाचे लक्ष्य होते, मात्र प्रत्यक्षात १ हजार ९२६ कर्मचाऱ्यांचेच लसीकरण झाले. ॲप धिम्या गतीने कार्यरत आहे. नोंदणीसाठी वेळ लागत आहे. दीर्घकालीन किंवा गरोदर महिलांच्या नोंदणीसाठी वेगळी सोय नसल्याच्या समस्या समोर येत आहेत. ॲपमधील तांत्रिक समस्येमुळे कागदावर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याचे बऱ्याच केंद्रांवर दिसून आले. याविषयी, केंद्र शासनाशी सातत्याने चर्चा सुरू असून तांत्रिक अडचणी लवकरच दूर करण्यात येतील आणि नियोजनानुसार लसीकरण होईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
.....................