लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रभादेवी, वरळी, महालक्ष्मी, लोअर परळ इत्यादी परिसरांचा समावेश असणाऱ्या महापालिकेच्या जी दक्षिण विभाग कार्यालयात सेन्सर आधारित स्वयंचलित थर्मामीटर, सेन्सर व टायमर आधारित कार्य करणारे हात धुण्याचे मशीन, याच पद्धतीने काम करणारे सॅनिटायझर मशीन बसविण्यात आले आहेत. कार्यालयात येणारी प्रत्येक फाईलही प्रवेशद्वारावर असणाºया अल्ट्राव्हायोलेट किरणांनी (यु.व्ही रेज) निर्जंतुक केली जात आहे. या सर्व बाबी प्रामुख्याने विभाग कार्यालयात कार्यरत असणाºया महापालिका अभियंत्यांच्या कल्पक पुढाकाराने प्रत्यक्षात आल्या असल्याचेही सहायक आयुक्त शरद उघडे यांनी नमूद केले आहे.अभिनव प्रतिबंधात्मक उपाययोजना समजावून घेण्यासाठी गेल्या काही दिवसांत अनेक कॉर्पोरेट कंपन्यांच्या, खासगी संस्थांच्या प्रतिनिधींनी महापालिकेच्या विभाग कार्यालयाला अभ्यास भेटी दिल्या आहेत.जी दक्षिण विभागाची लोकसंख्या ही सुमारे ३ लाख ८९ हजार इतकी आहे. या विभागाचे प्रशासकीय कार्यालय प्रभादेवी (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळील धनमिल नाक्याजवळ व ना.म. जोशी मार्गालगत आहे. याच विभाग कार्यालयाच्या इमारतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभिनव उपयोग करून कोविडविषयक विविध प्रतिबंधात्मक बाबींची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. कार्यालयातील शौचालयांमध्ये आॅटोमॅटिक सॅनिटायझर्स बसविण्यात आले आहेत. त्यामुळे ठरावीक कालावधीनंतर शौचालय स्वयंचलित पद्धतीने सॅनिटाईझ होत आहेत. यापैकी बहुतांश यंत्रांचे डिझाईन व निर्मिती महापालिकेच्याच अभियंत्यांनी स्वत: पुढाकार घेऊन केली आहे.सुरक्षा चौकीलगतच्या भिंतीवर थर्मल स्कॅनर पद्धतीची तापमान मोजणी यंत्रे वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बसविण्यात आली आहेत. या भिंतीवरील यंत्रासमोर उभे राहणाºया व्यक्तीच्या शरीराचे तापमान स्वयंचलित पद्धतीने मोजले जात आहे. तसेच हे तापमान निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक असल्यास या यंत्रातून स्वयंचलितपणे सायरनचा (भोंगा) आवाज येतो. यामुळे एखाद्या व्यक्तीला ताप असल्यास त्याची स्वयंचलित पद्धतीने पडताळणी होते. यानंतर सदर व्यक्तीला पुढील आवश्यक त्या तपासणीसाठी महापालिकेच्या दवाखान्यात पाठविले जाते. शौचालयांमध्ये स्वयंचलित सॅनिटायझेशन मशीन बसविण्यात आले आहे.शौचालयांचे स्वयंचलित पद्धतीने सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. याअंतर्गत मशीनमध्ये पाच मिनिटांपासून तर दोन तासांपर्यंतचा कालावधी सेट करण्याची सुविधा आहे.लिफ्टमध्ये हाताने दाबावयाचे बटण न ठेवता त्याऐवजी पायाने दाबावयाचे वैशिष्ट्यपूर्ण खटके यापूर्वीच बसविण्यात आले आहेत. लिफ्टच्या बाहेरही लिफ्ट बोलावण्यासाठी असणारी बटणे फूट ओपरेटेड पद्धतीचीच बसविण्यात आली आहेत.हात धुण्यासाठी थर्मल स्कॅनर च्हात धुण्याचे यंत्र बसविण्यात आले आहे. यंत्राच्या खाली विशिष्ट अंतरावर हात नेल्यानंतर या यंत्रामधून सुमारे एक सेकंद एवढ्या कालावधीसाठी हॅण्डवॉश लिक्विड हातावर येते. त्यानंतर पाण्याचा फवाराही सुरू होतो. यामुळे कुठेही स्पर्श न करता व्यक्तीला त्याचे हात सुयोग्य प्रकारे धुता येतात.च्या यंत्रामध्येही थर्मल स्कॅनर बसविण्यात आले आहे. ज्यामुळे हात धुणाºया व्यक्तीचे तापमान कळते. अधिक तापमान असणाºया व्यक्तीबाबत वरीलप्रमाणेच सायरनचा आवाज येतो.प्रवेशद्वाराजवळ‘स्क्रिनिंग झोन’च्प्रवेशद्वाराजवळ यु.व्ही. रेंजद्वारे (अतिनील किरणांद्वारे) निर्जंतुकीकरण करणारे यंत्र बसविण्यात आले आहे. यंत्रामध्ये फाईल, संदर्भ पुस्तके, रजिस्टर, नोंदवह्या, सॅक बॅग इत्यादी वस्तू ६० सेकंद एवढ्या कालावधीसाठी ठेवून निर्जंतुककरण्यात येत आहेत.च्फाईल स्कॅनिंगसाठी लवकरच आणखी एक अत्याधुनिक मशीन कार्यान्वित करण्यात येणार आहे. विभाग कार्यालय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविण्यात आलेल्या या अत्याधुनिक यंत्रांच्या परिसराला ‘स्क्रिनिंग झोन’ असे नाव देण्यात आले आहे.
कोविड पडताळणीसाठी होणार तंत्रज्ञानाचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 1:28 AM