'मातोश्री'त उद्धव, आदित्य ठाकरेंचं मंथन; तर रस्त्यावर तेजस ठाकरेंनी अशी सांभाळली सारी व्यवस्था! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 04:34 PM2023-02-18T16:34:14+5:302023-02-18T16:36:55+5:30

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील बैठकीत पुढील रणनितीवर मंथन करण्यात व्यस्त होते. तर अशावेळी तेजस ठाकरे थेट 'मातोश्री' बाहेर रस्त्यावर कार्यकर्त्यांमध्ये होते.

Tejas Thackeray took care of all the arrangements outside the matoshree about uddhav thackeray speech | 'मातोश्री'त उद्धव, आदित्य ठाकरेंचं मंथन; तर रस्त्यावर तेजस ठाकरेंनी अशी सांभाळली सारी व्यवस्था! 

'मातोश्री'त उद्धव, आदित्य ठाकरेंचं मंथन; तर रस्त्यावर तेजस ठाकरेंनी अशी सांभाळली सारी व्यवस्था! 

googlenewsNext

मुंबई-

केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि भाजपावर घणाघात केला. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री'वर पक्षाच्या पदाधिकारी आणि नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. यासाठी 'मातोश्री'वर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. 

कारच्या टपावरचं 'ते' भाषण... तेव्हा आणि आता! उद्धव ठाकरेंनी वापरला बाळासाहेबांचा फॉम्युला

उद्धव ठाकरेंनी बैठकीला जाण्याआधी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि ते बैठकीला गेले. पण बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी कायम होती. अशावेळी पुन्हा एकदा लक्ष वेधलं ते म्हणजे तेजस ठाकरे यांनी. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील बैठकीत पुढील रणनितीवर मंथन करण्यात व्यस्त होते. तर अशावेळी तेजस ठाकरे थेट 'मातोश्री' बाहेर रस्त्यावर कार्यकर्त्यांमध्ये होते. कार्यकर्त्यांना बळ देताना ते पाहायला मिळाले.  

डंख मारायची वेळ आलीय; उद्धव ठाकरे ओपन जीपवर, शिवसैनिकांच्या गराड्यात

तेजस ठाकरे याआधीही राजकीय व्यासपीठावर काही कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळाले आहेत. पण ते अजूनही सक्रियपणे राजकारणात पूर्णवेळ पाहायला मिळालेले नाहीत. पण आता पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर तेजस ठाकरे पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांमध्ये थेट रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं. बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी 'मातोश्री' बाहेर येणार असल्याचं निश्चित झालं. त्यासाठी ओपन कार, माइक आणि स्पीकरची व्यवस्था करण्यातही तेजस ठाकरेंनी पुढाकार घेतलेला पाहायला मिळाला. 

"माझ्या हातात आज काही नाही, पण...", कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना उद्धव ठाकरे भावूक!

उद्धव ठाकरेंच्या भाषणासाठी ओपन कार 'मातोश्री' बाहेर सज्ज होती. तिथं पूर्णवेळ तेजस ठाकरे उभे होते. कार्यकर्त्यांच्या गराड्यात ते सारं व्यवस्थापन पाहात होते. तसंच तेथील परिस्थितीची माहिती फोनवरुन आत मातोश्रीत देताना पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे बाहेर आल्यानंतर त्यांना कारपर्यंत मार्गदर्शन करण्याची आणि कारमध्ये बसवण्याचीही जबाबदारी तेजस ठाकरे यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतलेली पाहायला मिळाली. सोबत आदित्य ठाकरे देखील होते. पण आदित्य ठाकरे देखील आता पक्षाचे नेते आणि आमदार असल्यानं तेही 'मातोश्री'त उद्धव ठाकरेंसोबत बैठकीत व्यस्त होतं. अशावेळी बाहेर कार्यकर्त्यांमध्ये जाऊन सारं व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी तेजस ठाकरे पार पाडत होते.  

तेजस ठाकरे याआधीही पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं आहे. आदित्य यांनीही तेजस आवर्जुन काही कार्यक्रमांना उपस्थित राहत आला आहे. त्याचंही पक्षाच्या काही कामांमध्ये लक्ष असतं असं म्हटलं होतं. तेजस ठाकरेंनी अद्याप पक्षात कोणतंही पद किंवा अधिकृत जबाबदारी घेतलेली नाही. 

Web Title: Tejas Thackeray took care of all the arrangements outside the matoshree about uddhav thackeray speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.