तेजस ठाकरेंचं नवं संशोधन; सह्याद्रीच्या खोऱ्यात शोधली सापाची प्रजाती, दिलंय 'हे' नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 02:46 PM2023-08-22T14:46:14+5:302023-08-22T14:48:50+5:30

तेजस ठाकरे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि डोंगररांगात फिरत असतात.

Tejas Thackeray's New Research; A species of snake discovered from the Sahyadri valley, Sahyadri ophas | तेजस ठाकरेंचं नवं संशोधन; सह्याद्रीच्या खोऱ्यात शोधली सापाची प्रजाती, दिलंय 'हे' नाव

तेजस ठाकरेंचं नवं संशोधन; सह्याद्रीच्या खोऱ्यात शोधली सापाची प्रजाती, दिलंय 'हे' नाव

googlenewsNext

मुंबई - शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी शिवसेनेची कमान आपल्या हाती घेतल्याचं दिसून येतंय. शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार टीका करत आदित्य यांनी लोकांमध्ये मिसळण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. अनेक मुद्द्यांवरुन आदित्य यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला लक्ष्यही केलं. दरम्यान, उद्धव ठाकरेंचे दुसरे सुपुत्र तेजस ठाकरेही आता राजकीय मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, अद्यापही तेजस ठाकरे आपला छंद जोपासत असल्याचे दिसून आले. खेकड्यांच्या प्रजातीवर संशोधन केल्यानंतर आता, तेजस यांनी सापांची नवी प्रजाती शोधली आहे. 

तेजस ठाकरे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि डोंगररांगात फिरत असतात. आपला छंद जोपासत नवं संशोधन करण्यासाठी ते ठाकरे वाईल्ड लाईफ संसोधन संस्थेशीही जोडले आहेत. तेजस ठाकरे तसेच ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक हर्शिल पटेल यांनी पश्चिम घाटात संशोधनादरम्यान सापाची नवी प्रजाती शोधून काढली आहे. या प्रजातीली 'सह्याद्रीओफिस' असं नाव त्यांनी दिलंय. त्यामुळे, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संसोधनात आणखी एक भर पडली आहे. 
नॅशनल हिस्ट्री म्युझियम, लंडन आणि मॅक्स प्लँक इन्स्टिटय़ूट, जर्मनी या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचे हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.

'सह्याद्रीओफिस' असं या सापाला नाव देण्यात आलं आहे. त्यामध्ये संस्कृत शब्द सह्याद्री  आणि ग्रीक शब्द ओफिस म्हणजे साप यावरून या नव्या प्रजातीला 'सह्याद्रीओफिस' असं नाव दिलं गेलं आहे.  ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या या नव्या शोधामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेबाबत नवनवीन माहिती जनतेसाठी उपलब्ध होत आहे. 

यापूर्वी पालींच्या ५ प्रजातींचा शोध

महाराष्ट्रातील तरुण संशोधकांनी तमिळनाडूमधील जिल्ह्यातून पालीच्या पाच नव्या प्रजातींचा शोध लावला होता. निमास्पिस कुळातील या प्रजाती असून ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनकडून गेकोस ऑफ पेनिन्सुला इंडिया हा प्रकल्प राबविण्यात आला होता. संस्थेतील संशोधकांनी निमास्पिस कुळातील पाच पालींचा शोध लावला. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे ईशान आगरवाल, तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकर यांनी संशोधन केले होते.

Web Title: Tejas Thackeray's New Research; A species of snake discovered from the Sahyadri valley, Sahyadri ophas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.