Join us

मातोश्री बंगल्याच्या उंबरठ्यावर कोरोना, तेजस ठाकरेंच्या 2 सुरक्षा रक्षकांना लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 5:47 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्र्यातील कलानगरस्थित असलेल्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्र्यातील कलानगरस्थित असलेल्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते

मुंबई - कोरोना व्हायरसची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच राज्यातील महाविकासआघाडीतील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याबाबत त्यांनीच ट्विट करून माहिती दिली आहे. तर, आता मातोश्रीच्या प्रांगणातही कोरोना पोहोचल्याने काहीसं टेन्शन वाढलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लहान चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर, तेजस ठाकरे यांच्या इतर सुरक्षा रक्षकांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्र्यातील कलानगरस्थित असलेल्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करत 14 दिवसांसाठी क्वॉरंटाईन केले होते. आता पुन्हा एकदा मातोश्रीचं टेन्शन वाढलं असून योग्य ती काळजी महापालिका प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचे लहान बंधु तेजस यांच्या सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही मातोश्री बंगल्याजवळ तैनात असलेल्या पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती. 

मातोश्रीनंतर कोरोनाने थेट मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानाबाहेर धडक दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर तैनात असलेल्या एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला कोरोनाची बाधा झाली होती. या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा Covid-19 चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून एकूण रुग्णसंख्या 3 लाखांवर पोहोचली आहे. त्यातच, रविवारी 9 हजारांपेक्षा जास्त म्हणजे आजपर्यंतच्या एका दिवसातील बाधित रुग्णांच्या संख्येतील सर्वाधित रुग्ण आढळून आले आहेत.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याउद्धव ठाकरेमुंबई