Tejaswi Ghosalkar Death Threat: "लालचंद पाल सुधर जा, इसकी पत्नी...", तेजस्वी घोसाळकर आणि साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:15 IST2025-04-04T17:10:16+5:302025-04-04T17:15:31+5:30
Tejaswi Ghosalkar Death Threat: अभिषेक घोसाळकर यांची हत्या होऊन एक वर्ष झाले आहे, आता त्यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनाही जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे.

Tejaswi Ghosalkar Death Threat: "लालचंद पाल सुधर जा, इसकी पत्नी...", तेजस्वी घोसाळकर आणि साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी
Tejaswi Ghosalkar Death Threat: ठाकरे गटाचे नेते नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची हत्या होऊन एक वर्ष झाले. हत्येचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान, आता या हत्येच्या वर्षभराने अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना व्हॉट्स अॅपवरुन जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या धमकी प्रकरणी बोरीवली एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
“अजित पवारांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटला, वक्फ विधेयकाला पाठिंबा देणे सत्तेसाठी लाचारी”
धमकी प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घोसाळवर यांना ही धमकी एका व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून दिली आहे. तर अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेल्या लालचंद पाल यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. घोसाळकर यांच्या हत्येचा तपासी सीबीआय करत आहे. दरम्यान, आता पत्नी आणि मुख्य साक्षीदाराला धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.
व्हॉट्स अॅपवर आलेल्या धमकीमध्ये काय आहे?
१ एप्रिल रोजी हा धमकीचा मेसेज व्हॉट्स अॅपवर आला आहे . 'गरीब नवाज नियाज कमिटी' या व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज आला. या ग्रुपवर शरीफ नावाच्या व्यक्तीने दिवंगत अभिषेक विनोद घोसाळकर यांचा फोटो टाकून त्याखाली इंग्रजीमध्ये Lalchand inko Dekhkar Sudhar Ja, Isko biwi ko mat marva dena Lalchand" असा मजकूर लिहून मला जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी फिर्याद लालचंद पाल यांनी दिली आहे.
अभिषेक घोसाळकरांची ८ फेब्रुवारीला हत्या झाली होती
८ फेब्रुवारी राेजी अभिषेक घोसाळकर मॉरिस नरोन्हा याच्या कार्यालयात एका कार्यक्रमासाठी गेले होते. या कार्यक्रमाचे नरोन्हा याने फेसबुक लाइव्ह केले होते. हे फेसबुक लाइव्ह संपतेवेळी त्याने घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडत त्यांची हत्या केली. त्यानंतर लगेच त्यानेदेखील स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. यानंतर सर्वप्रथम बोरिवलीच्या एमएचबी कॉलनी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुन्हे शाखेकडे हा तपास हस्तांतरित करण्यात आला होता.