Join us

शिवप्रेमींकडून दुर्बिणीने शिवस्मारकाचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 6:37 AM

अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होऊन एक वर्ष लोटले, तरी स्मारकासाठी एक वीटही रचली नसल्याचा आरोप करत शिवप्रेमींनी सोमवारी प्रतीकात्मक आंदोलन केले

मुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होऊन एक वर्ष लोटले, तरी स्मारकासाठी एक वीटही रचली नसल्याचा आरोप करत शिवप्रेमींनी सोमवारी प्रतीकात्मक आंदोलन केले. मरिन लाइन्सच्या किनारी हाती दुर्बीण घेत पर्यटकांना शिवस्मारक पाहण्यास येण्याचे आवाहन करून शिवप्रेमींनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली.या वेळी ‘या... शिवस्मारक पाहा!’ असे फलक हाती घेऊन शिवप्रेमींनी आपला रोष व्यक्त केला. नाराज शिवप्रेमी मनोज अमरे यांनी सांगितले, महापालिका निवडणुकीवेळी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे मुंबईत भव्य भूमिपूजन केले. मात्र अद्यापपर्यंत संबंधित जागेवर कोणतेही बांधकाम सुरू केलेले नाही. त्यामुळे या प्रतीकात्मक रूपाने सरकारला शिवस्मारकाचे स्मरण करून देत आहोत. यापुढे वेगळ्या मार्गाने शिवस्मारकाचे आंदोलन करण्याचा इशाराही अमरे यांनी दिला. दरम्यान, हाती फलक घेऊन निषेध व्यक्त करणाºया शिवप्रेमींना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले.

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराज