Join us

सांगा, तुम्ही कोरोना प्रभावित देशांमधून आला तर नाहीत ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 8:10 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून बुधवारपासून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून भरून घेत आहेत प्रतिज्ञापत्र विमानतळावर हेल्प डेस्क

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून बुधवारपासून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येत आहे. गेल्या १४ दिवसात तुम्ही कोरोना विषाणूने प्रभावित १३ देशांमध्ये गेले होते वा नाही, या संदर्भातील माहिती प्रतिज्ञापत्रात विचारण्यात येत आहे. जर प्रवासी या देशांपैकी कोणत्याही देशातून प्रवास करून आला असेल तर त्याला विमानतळाच्या इमिग्रेशन काऊंटरवर बाजूला करून तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.यासंदर्भात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून विमानतळाला निर्देश आले आहेत. नागपूर विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणाने पोहोचणाºया प्रवाशांकडून फॉर्म भरून घेण्यासाठी इमिग्रेशन काऊंटरजवळ एक विशेष हेल्प डेस्क स्थापन केला आहे. या ठिकाणी एका खासगी रुग्णालयातील दोन पॅरामेडिकल स्टाफ, विमानतळ टर्मिनल व्यवस्थापक आणि इमिग्रेशनचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.नागपुरात आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कतार एअरवेजची नागपूर-दोहा-नागपूर (दरदिवशी) आणि एअर अरेबिया एअरलाईन्सचे नागपूर-शारजाह-नागपूर उड्डाण आठवड्यात शुक्रवार व रविवारी आहे. या दोन्ही देशांची कोरोना प्रभावित देशांमध्ये नोंद नाही. पण नागपुरात दोहा वा शारजाहला जाणाºया प्रवाशाने कोरोना विषाणूने प्रभावित देशांची यात्रा केली वा नाही तसेच प्रभावित देशातून नागपुरात आला का, याची खबरदारी म्हणून प्रवाशांकडून माहिती भरून घेण्यात येत आहे.विमानतळावर तपासणीच्या उपाययोजनाकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार, नागपूर विमानतळावर प्रतिज्ञापत्र (सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म) भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय तपासणीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मंगळवारी सायंकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. इमिग्रेशन विभागाचे अधिकारी संदिग्ध स्थितीतील प्रवाशाला वेगळे करून तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविणार आहे.आबीद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.कुणालाही माहिती दडविता येणार नाहीजर प्रवासी नागपूर ते दोहा वा शारजाहला गेल्यानंतर कोणत्याही अन्य देशांचा प्रवास करून नागपुरात परतला असेल आणि प्रतिज्ञापत्रात या बाबींचा त्याने उल्लेख केला नसेल तर त्याच्या पासपोर्टवर होणाºया स्टॅम्पिंगने सत्यस्थिती समोर येणार आहे. त्यामुळे कुणालाही माहिती दडविता येणार नाही. समांतररीत्या पासपोर्ट स्कॅनिंगची प्रक्रिया सुरू राहणार आहे. फॉर्म भरल्याने सर्व प्रवाशांची विस्तृत माहिती गोळा होणार आहे.अमित कासटवाड, टर्मिनल व्यवस्थापक़आरोग्य विभाग गंभीर नाहीनिर्देशानुसार विमानतळावर विदेशातून येणाºया दोन विमानांच्या आगमनावेळी हेल्प डेस्कवर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना तैनात राहण्याची गरज आहे. विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात आरोग्य विभागाशी निरंतर संपर्क साधण्यात आला, पण बुधवारी सायंकाळपर्यंत विभागाने या ठिकाणी अधिकारी वा कर्मचाºयाची नियुक्ती केल्याची बाब स्पष्ट केलेली नाही. कोरोना विषाणूच्या संदर्भात शासनाचा आरोग्य विभाग किती गंभीर आहे, हे यावरून दिसून येते.

 

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर