सांगा बरं, मोदींना कोण, कोण मत देणार?; रवींद्र चव्हाण यांच्या प्रश्नाने अधिकारी अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 09:51 AM2023-11-12T09:51:04+5:302023-11-12T09:52:10+5:30

केंद्र सरकार निधी देत असल्याने रस्ते, पुलांचे रुपडे बदलले आहे. आपल्यापैकी किती अधिकारी हे लोकांना सांगतात, असा प्रश्न चव्हाण यांनी केला. 

Tell me, who will vote for Narendra Modi? The officer was speechless by Ravindra Chavan's question | सांगा बरं, मोदींना कोण, कोण मत देणार?; रवींद्र चव्हाण यांच्या प्रश्नाने अधिकारी अवाक्

सांगा बरं, मोदींना कोण, कोण मत देणार?; रवींद्र चव्हाण यांच्या प्रश्नाने अधिकारी अवाक्

- यदु जोशी

मुंबई : पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत तुमच्यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूने (भाजप) कोण मतदान करणार आहे सांगा? हात वर करा... राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा प्रश्न केला आणि अधिकारीही अवाक् झाले. पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळावे यासाठी आपल्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना साद घालण्यासाठी मंत्री चव्हाण यांनी घेतलेल्या या पुढाकाराची विभागामध्ये सध्या चांगलीच चर्चा आहे. 

खात्रीलायक  सूत्रांनी सांगितले की, चव्हाण यांनी येथील बांधकाम भवनात राज्यातील मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंत्यांच्या दोन दिवस बैठका घेतल्या. ७ नोव्हेंबरला मुंबई, कोकण, नाशिक आणि पुणे विभागातील अधिकाऱ्यांना तर ८ नोव्हेंबरला विदर्भ, मराठवाड्यातील अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलविले होते. यावेळी चव्हाण यांनी भाजप, पंतप्रधान मोदी यांच्याबाबत प्रचारकी सूर लावला. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक चांगल्या योजना आहेत.  केंद्र सरकार निधी देत असल्याने रस्ते, पुलांचे रुपडे बदलले आहे. आपल्यापैकी किती अधिकारी हे लोकांना सांगतात, असा प्रश्न चव्हाण यांनी केला. 

Web Title: Tell me, who will vote for Narendra Modi? The officer was speechless by Ravindra Chavan's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.