तापमान ३४ अंश, मात्र उकाडा खुप; विजेची मागणी पोहोचली ४ हजार मेगावॉटवर
By सचिन लुंगसे | Published: May 21, 2024 10:50 PM2024-05-21T22:50:40+5:302024-05-21T22:51:09+5:30
Mumbai: मुंबईचे कमाल तापमान ३४ ते ३५ अंशावर स्थिर राहत असले तरी आर्द्रता खुप नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे ऊकाड्यात वाढ होत असून, मुंबईकर घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. या वाढत्या ऊकाड्यापासून सुटका करण्यासाठी दिवसरात्र एसी, पंखे आणि कुलर चालविले जात आहेत.
मुंबई - मुंबईचे कमाल तापमान ३४ ते ३५ अंशावर स्थिर राहत असले तरी आर्द्रता खुप नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे ऊकाड्यात वाढ होत असून, मुंबईकर घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. या वाढत्या ऊकाड्यापासून सुटका करण्यासाठी दिवसरात्र एसी, पंखे आणि कुलर चालविले जात आहेत. त्यामुळे मुंबईच्या विजेच्या मागणीत वाढ होत असून, मंगळवारी मुंबईत विजेची मागणी ४ हजार ३०७ मेगावॉट नोंदविण्यात आले आहे. शिवाय गुजरात व मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात पाच दिवस उष्णतेच्या लाट सदृश स्थितीसहित दमटयुक्त उष्णतेची स्थिती जाणवेल. त्यामुळे मुंबईकरांच्या त्रासात आणखी भर पडणार आहे.
गुजरात व मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात पाच दिवस उष्णतेच्या लाट सदृश स्थितीसहित दमटयुक्त उष्णतेची स्थिती जाणवेल. उष्णतेचा प्रभाव मुंबई शहर, ठाणे येथे अधिक जाणवेल. संपूर्ण विदर्भ, मराठवाडा येथे कमाल तापमान सरासरीपेक्षा ४ ते ६ ने अधिक म्हणजे ४० ते ४४ दरम्यान राहील. २५ मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची स्थिती जाणवू शकते. तर राज्यात २५ मे पर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
सर्वसाधारणरित्या मुंबईत रोज विजेची मागणी ३ हजार ५०० मेगावॉट नोंदविले जाते. मात्र उन्हाळ्यात विजेचा उपकरणांचा वापर वाढल्याने विजेची मागणी ४ हजार मेगावॉटच्या पुढे नोंदविली जात आहे. मंगळवारी टाटा पॉवरकडून १ हजार ३० मेगावॉट व अदानी इलेक्ट्रिसिटीकडून २२५३ मेगावॉट विजेचा पुरवठा करण्यात आला.