तापमानाचे हेलकावे आणि घामाच्या धारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 05:50 AM2018-10-23T05:50:02+5:302018-10-23T05:50:14+5:30

मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांच्या कमाल तापमानाचा पारा चढाच असून, सोमवारी राज्यातील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ३५ ते ३७ अंशांदरम्यान नोंदविण्यात आले आहे.

Temperature fluctuations and sweat stream | तापमानाचे हेलकावे आणि घामाच्या धारा

तापमानाचे हेलकावे आणि घामाच्या धारा

Next

मुंबई : मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांच्या कमाल तापमानाचा पारा चढाच असून, सोमवारी राज्यातील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ३५ ते ३७ अंशांदरम्यान नोंदविण्यात आले आहे. मुंबईचे कमाल तापमान ३५.७ अंश नोंदविण्यात आले असून, येथील कडाक्याच्या उन्हासह उकाड्याने मुंबईकरांना घाम फोडला आहे. एकंदर तापमानातील चढउतार आणि घामाच्या धारांनी मुंबई भिजली आहे.
गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत
कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही
भागांत कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. कोकण, गोवा,
मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. २३ ते
२४ आॅक्टोबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान
कोरडे राहील. २५ ते २६ आॅक्टोबरदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. २३ आणि २४ आॅक्टोबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २४ अंशाच्या आसपास राहील. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरातील धूलिकणांचे प्रमाण कमी अधिक होत असून, ‘सफर’च्या नोंदीनुसार, सोमवारी हे प्रमाण अधिकच नोंदविण्यात आले आहे.
>अकोला ३७.१, अमरावती ३७.२, बीड ३७, जळगाव ३७, मुंबई ३५.७, नागपूर ३६.५, नांदेड ३६, परभणी ३६.२, वर्धा ३६.६, यवतमाळ ३६.५

Web Title: Temperature fluctuations and sweat stream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.