Join us  

पाच तास डोक्याला ताप

By admin | Published: July 28, 2014 1:51 AM

स्थानकांवर गर्दी, लोकल पकडण्यासाठी होणारी धावपळ आणि नेहमीप्रमाणे उशिराने धावत असणाऱ्या लोकल़़़ असेच चित्र प्रत्येक मेगाब्लॉकच्या दिवशी रेल्वेमार्गांवर दिसते

मुंबई : स्थानकांवर गर्दी, लोकल पकडण्यासाठी होणारी धावपळ आणि नेहमीप्रमाणे उशिराने धावत असणाऱ्या लोकल़़ असेच चित्र प्रत्येक मेगाब्लॉकच्या दिवशी रेल्वेमार्गांवर दिसते. यंदाच्या ब्लॉकमधून पश्चिम रेल्वे प्रवाशांची सुटका झाली. मात्र मेगाब्लॉकमुळे पाच तास मध्य रेल्वे आणि हार्बर प्रवाशांच्या डोक्याला ताप झाला. ठाणे ते दादरपर्यंत सगळ्याच स्थानकांवर गर्दीचे चित्र होते. धीम्या मार्गावरच जलद लोकल येत असल्याने लोकल पकडताना अनेकांची धांदल उडत होती. मध्य रेल्वेमार्गाबरोबरच नेरूळ ते मानखुर्ददरम्यानही अप आणि डाऊन मार्गावर याच वेळेला ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे सीएसटी ते पनवेल, बेलापूर आणि वाशीपर्यंत धावणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. त्याचा फटका हार्बरवासीयांना बसत होता. हार्बरवासीयांच्या सोयीसाठी सीएसटी ते मानखुर्द आणि ठाणे ते पनवेलदरम्यान विशेष ट्रेन चालवण्यात येत होत्या, तरीही त्याचा फारसा फायदा प्रवाशांना मिळत नव्हता.