Join us

पावसाच्या विश्रांतीनंतर तापमानात वाढ

By admin | Published: June 30, 2015 1:32 AM

मुंबईसह उपनगरात कोसळणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईसह उपनगरात कोसळणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २८ अंशांवर पोहोचले आहे. शिवाय आर्द्रतेतही वाढ झाली आहे. परिणामी दिवसासह रात्रीच्या उकाड्यात वाढ झाली असून, वाढत्या तापमानामुळे ऐन पावसाळ्यात मुंबईकर घामाघूम होत आहेत. मान्सूनने काही कालावधीतच शहरासह उपनगराला झोडपून काढले. परंतु गेल्या आठवड्यातील शुक्रवारी मान्सूनने देश व्यापल्यानंतर पाऊस कमी झाला. परिणामी कमाल, किमान तापमानासह आर्द्रतेमधील वाढीमुळे मुंबईकरांना उकाड्याला सामोरे जावे लागले. प्रादेशिक हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत कमाल, किमान तापमान अनुक्रमे ३२, २७ अंशांच्या आसपास राहील. (प्रतिनिधी)