Join us

मुंबईचे तापमान १९ अंशावर, पहाटेस गार वारे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 5:47 AM

शुक्रवारी राज्यात सर्वांत कमी किमान तापमान जळगाव येथे १३.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.

मुंबई : शुक्रवारी राज्यात सर्वांत कमी किमान तापमान जळगाव येथे १३.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. मुंबईचे किमान तापमान १९ अंश नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईच्या हवेत काहीसा गारवा जाणवू लागला आहे.मुंबईकरांना विशेषत: सकाळच्या सुमारास गार वाऱ्याचा अनुभव घेता येत आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. ८ आणि ९ डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे राहणार आहे. तर, १० आणि ११ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. ८ आणि ९ डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, १९ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.