Join us

मुंबईकरांना आणखी घाम फुटणार; ऑक्टोबर हिट वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 8:35 PM

येत्या काही दिवसात उन्हाचा तडाखा बसणार

मुंबई : ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढतच असून, सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही वेधशाळांमध्ये शनिवारी कमाल तापमानाची नोंद ३७ अंश झाली आहे. वाढते तापमान, वाहते उष्ण वारे आणि उकाडा मुंबईकरांचा घाम काढत असून, उत्तरोत्तर यात वाढच नोंदवण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईकरांना आणखी घाम फुटणार आहे. भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. हवामान खात्याचा अंदाज- १४ ते १६ ऑक्टोबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.१७ ऑक्टोबर : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.मुंबईतील तापमान कसे असेल?१४ आणि १५ ऑक्टोबर : आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७, २७ अंशाच्या आसपास राहील. 

टॅग्स :मुंबईहवामानमहाराष्ट्र