Join us

तापमान वाढताच वीज मागणीतही वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 7:15 PM

१७७० मेगावँट जास्त वीज वापर

मुंबई : गेल्या दोन दिवसांत उन्हाचा पारा वाढू लागल्यानंतर राज्यातील विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या गुरूवारी म्हणजेच २८ आँगस्ट रोजी राज्याची दिवसभरातील सर्वोच्च मागणी १६ हजार ८८२ मेगावँट होती. ती ४ सप्टेंबर रोजी १८ हजार ७५२ मेगावँटपर्यंत पोहचली होती. मागणीत जवळपास १७७० मेगावँटची वाढ नोंदविण्यात आली आहे.   

गेल्या चार दिवसांपासून मुंबई आणि सभोवतालच्या महानगर क्षेत्रात त पावसाने दडी मारली आहे. विदर्भात काही प्रमाणात पाऊस सुरू असला तरी उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचा पारा वाढू लागला आहे. सप्टेंबर महिन्यांतच आँक्टोबर हिटचा अनुभव घेणा-या मुंबईकरांना तर या ऊन्हाने घाम फोडला आहे. अनेक ठिकाणी पंखे आणि एसीचा वापर गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाला आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. २८ आँगस्ट आणि ४ सप्टेंबर या दोन दिवसांतील विजेच्या मागणीची तुलना केल्यास त्याचा अंदाज येतो. मुंबईत सकाळी दहा वाजता गेल्या आठवड्यात २१४९ मेगावँट वीज मागणी होती. ती ४ सप्टेंबर रोजी ३८१ मेगावँट वाढून २५३० पर्यंत वाढली होती.

  

 

राज्यातील एकूण विजेची मागणी

 

वेळ

२८ आँगस्ट

४ सप्टेंबर

फरक

सकाळी १०

१७,८९१

१८,८८७

९६६

दुपारी १

१६,९८२

१८,७५२

१७७०

रात्री ८

१६,५८५

१८,४६२

१८८७

पहाटे ३

१३,६३२

१३,६३२

१३५३

 

टॅग्स :महावितरणमहाराष्ट्रहवामानतापमान