बाराशिव येथे टेम्पो उलटून सात जखमी
By admin | Published: November 25, 2014 10:45 PM2014-11-25T22:45:43+5:302014-11-25T22:45:43+5:30
मुरुड तालुक्यातील मौजे बाराशिव गावाच्या हद्दीत टेम्पो पलटी झाल्याने सात जण जखमी झाले.
Next
बोर्ली-मांडला : मुरुड तालुक्यातील मौजे बाराशिव गावाच्या हद्दीत टेम्पो पलटी झाल्याने सात जण जखमी झाले. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात मोहमद अफरोज महमद जमीर शाह (26, रा. माहीम, मुंबई) याने तक्रार दाखल केली आहे.
मुंबई येथून अल्लाद्दीन महमद्दीन अन्सारी (18) हा त्याच्या ताब्यातील टेम्पोमध्ये डेकोरेशनचे सामान घेवून निघाले असता सकाळी ताराबंदर बाराशिव दरम्यान आले असता टेम्पोच्या पाठीमागून कोणतेतरी अज्ञात वाहन ओव्हरटेक करीत होते. त्या वाहनाला पुढे जाण्यासाठी इशारा दिला असता अल्लादिन अन्सारी याचा अचानक तोल गेल्याने त्याच्या ताब्यातील टेम्पो हा रस्त्यावर पलटी झाल्याने टेम्पोत असणारे मोहम्मद अफ्रोज महमद जमीर शाह (26), आफतफ आलम (24), महमद इकराम (2क्), महमद साजिद (18 ), आरीफ अलाम ( 18), अब्दुल माजिद (16) सर्व रा. मुंबई हे कामगार जखमी झाले असून आफताफ आलम, महमद इकराम, महमद साजिद त्यांच्या डोक्याला मार लागला असून इतर किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्वाना उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
अपघात झाल्याचे वृत्त कळताच 1क्8 रुग्णवाहिका व त्यावरील कर्मचारी ताबडतोब अपघातस्थळी पोहचून सदर टेम्पोचा पत्र कापून जखमींना बाहेर काढले. याबाबत रेवदंडा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून रेवदंडा पोलीस ठाण्याचे पो.नि. आबासाहेब पाटील तपास करीत आहेत.