Join us

हल्लेखोरांनी वापरलेला टेम्पो जप्त

By admin | Published: December 17, 2015 2:40 AM

प्रसिद्ध शिल्पकार हेमा उपाध्याय (वय ४२) आणि त्यांचे वकील हरिश भंबानी (६५) यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार गोटू अद्याप फरारी आहे. त्याच्या शोधासाठी विविध ठिकाणी

मुंबई : प्रसिद्ध शिल्पकार हेमा उपाध्याय (वय ४२) आणि त्यांचे वकील हरिश भंबानी (६५) यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार गोटू अद्याप फरारी आहे. त्याच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके पाठविण्यात आली असली, तरी तो हाती लागलेला नाही. दरम्यान, हल्लेखोरांनाी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेला टेम्पो पोलिसांनी बुधवारी जप्त केला. कांदिवली पश्चिम लालजीपाडा येथील गांधीनगरमध्ये असलेल्या दुर्गामाता चाळ कमिटीतील गाळ्यात विद्याधर राजभर उर्फ गोटू याने हेमा आणि हरिश यांची हत्या केली. त्यानंतर त्याने विजय राजभर उर्फ विकास टेम्पोवाला याचा टेम्पो बुक केला आणि दोघांचे मृतदेह या टेम्पोत भरून, नंतर ते लालजीपाडा नाल्यात टाकले. हत्याकांडाचा मुख्य आरोपी गोटू हा अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हा टेम्पो या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) शिवकुमारला केले हजरकांदिवली पोलिसांनी विजय राजभर उर्फ विकास, आझाद राजभर आणि प्रदीप राजभर यांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे, तर उत्तर प्रदेशच्या एसटीएफ पोलिसांनी बनारसमधून ताब्यात घेतलेल्या शिवकुमार उर्फ साधू याला बुधवारी सकाळी बोरीवली न्यायालयात हजर करण्यात आले.विद्याधर राजभरने हे क्रूर कृत्य केलेच कसे? विद्याधर राजभरच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर चिंतनने विद्याधरला नेहमीच आर्थिक सहकार्य केले. नजरेला नजर न भिडविणारा विद्याधर असे भयानक कृत्य करेल, यावर विश्वासच बसत नाही, अशा शब्दांत एका कलाकाराने या प्रकरणाबाबत भाष्य केले. चिंतनच्या समर्थनार्थ हा कलाकार गुन्हे शाखेत नेहमीच येत असतो. या कलाकाराने सांगितले की, विद्याधरने हा प्रकार केल्याचे ऐकून धक्काच बसला. जो विद्याधर नेहमी सर्वांसोबत असायचा, सर्वांचे म्हणणे ऐकायचा, त्याचा या खून प्रकरणात सहभाग असल्याचे ऐकून धक्का बसला. विद्याधरचे कुटुंब आर्थिक परिस्थितीशी झगडत होते, अशी माहितीही पुढे आली आहे. विद्याधरचे वडील वंशराज हे त्यांच्या कलेत निपुण होते. तथापि, विद्याधरच्या शिक्षणाबाबत ते नेहमीच काळजी करायचे. विद्याधरने संगणकाचे ज्ञान मिळवावे, ही त्यांची इच्छा. त्यामुळेच मी माझा संगणक विद्याधरला दिल्याचे या कलाकाराने सांगितले. वंशराज यांचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाल्यानंतर हेमाने आम्हा सर्वांना सांगितले की, सर्वांनी मिळून विद्याधरला आर्थिक मदत करायला हवी. नाव न छापण्याच्या अटीवर या कलाकाराने ही माहिती दिली. या कलाकाराच्या एका महिला सहकाऱ्यानेही सांगितले की, विद्याधरशी जेव्हा भेट व्हायची आणि मी जेव्हा त्याला काही सांगत असे, तेव्हा विद्याधर अगदी जमिनीवर नजर ठेवून असायचा. फक्त जे काही सांगेल ते ऐकून घ्यायचा. या मराठी आर्टिस्टने सांगितले की, विद्याधरची पत्नी आणि त्याचे कुटुंब सध्या संघर्ष करत आहे. आम्हाला त्याचे दु:ख आहे.चांगले कुटुंब विद्याधरची बहीणही खूप चांगली आहे आणि आम्ही तिला यापुढेही सहकार्य करण्याचे ठरविले आहे. विद्याधरच्या वडिलांना वाटायचे की, त्याच्या पत्नीने एम.ए. पूर्ण करावे. आपल्या मूळ गावी एम.ए. पूर्ण केल्यानंतर विद्याधर तिला मुंबईला घेऊन आला.