सहसंचालक पदांसाठी पुन्हा तात्पुरत्या नेमणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:06 AM2021-03-16T04:06:20+5:302021-03-16T04:06:20+5:30
उच्च शिक्षण विभागातील पदे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उच्च शिक्षण विभागातील सहसंचालकांची पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. ...
उच्च शिक्षण विभागातील पदे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उच्च शिक्षण विभागातील सहसंचालकांची पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. या पदावर मर्जीतील आणि तात्पुरत्या नियुक्त्या केल्या जातात, अशा तक्रारी येत होत्या. तरीही आता पुन्हा तात्पुरत्या नेमणुका केल्या जाणार आहेत. याबाबत राज्य सरकारने ५ मार्च रोजी पत्र काढून विभागीय सहसंचालकांच्या तात्पुरत्या नियुक्तीची कार्यवाही जाहीर केली.
राज्य सरकारच्या आदेशानुसार उपसचिवांनी संचालकांना लिहिलेल्या पत्रात पात्र उमेदवारांना २६ मार्चपर्यंत अर्ज करता येतील. अर्जांची छाननी करून १५ एप्रिलपर्यंत ते सरकारला सादर करण्यास सांगण्यात आले आहे. उच्च शिक्षणातील महत्त्वाच्या बाबी पाहण्यासाठी संचालक पद निर्माण करण्यात आले. याचबरोबर स्थानिक पातळीवर काम पाहण्यासाठी राज्यभरात १० सहसंचालक पदांची निर्मिती करण्यात आली. या पदांवर शिक्षण क्षेत्रात काम करणारी व्यक्ती असावी, अशी अट आहे. याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णवेळ नियुक्ती केलेली नाही. तात्पुरत्या नियुक्तीमुळे या पदावरील व्यक्तीकडून आवश्यक ती कामे होत नसल्याने शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुुळे ही पदे आता पुन्हा तात्पुरती न भरता पूर्णवेळ भरावीत, अशी मागणी संबंधितांकडून होत आहे.
............................