Join us

आपत्कालीन परिस्थितीत १० हजार अनुयायांसाठी तात्पुरता निवारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 2:49 AM

महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर राज्यासह देशभरातून अनुयायी लाखोंच्या संख्येने दाखल होत असतात. येथे दाखल अनुयायांना सेवा सुविधा पुरविण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची असते.

मुंबई : महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर राज्यासह देशभरातून अनुयायी लाखोंच्या संख्येने दाखल होत असतात. येथे दाखल अनुयायांना सेवा सुविधा पुरविण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची असते. या वर्षीही अनुयायांना सर्व सेवा-सुविधा पुरविण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, चैत्यभूमीसह शिवाजी पार्क आणि लगतच्या परिसरात अनुयायांना सेवा मिळाव्यात, म्हणून ठिकठिकाणी आवश्यक काळजी घेण्यात येत असून, या सेवा-सुविधांचा वापर करण्याचे आवाहनही महापालिकेकडून करण्यात येत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरिता महानगरपालिकेने चैत्यभूमी, शिवाजी पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह यासह आवश्यक ठिकाणी सुसज्ज नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून येणाºया अनुयायांना, आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवाºयाची सोय म्हणून शिवाजी पार्क परिसरातील महापालिकेच्या ७ शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या असून, सुमारे १० हजार अनुयायांची त्यात व्यवस्था होऊ शकते. महानगरपालिकेतर्फे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित सचित्र माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. प्रतिवर्षी या माहिती पुस्तिकेच्या १ लाख प्रतींचे विनामूल्य वितरण चैत्यभूमी येथे करण्यात येते. या वर्षीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते शिवाजी पार्कातील माहिती कक्षात होणार आहे.रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त सुविधा पुरविण्याची मागणीभारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीला येणाºया अनुयायांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या सोडाव्यात, अतिरिक्त डबे जोडावेत, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने केली आहे.देशाच्या विविध भागांतून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी येत असल्याने, देशाच्या विविध भागांतून मुंबईत येणाºया रेल्वे गाड्यांना ४ ते ६ डिसेंबर या कालावधीत जादा डबे जोडावेत, सीएसएमटी व दादर टर्मिनसवरून महापरिनिर्वाण दिन विशेष गाड्या सोडाव्यात, ५ व ६ डिसेंबरला उपनगरीय मार्गावर पश्चिम रेल्वेतर्फे चर्चगेट ते विरार व मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कसारा, कर्जत मार्गावर शेवटची लोकल ते पहिली लोकल याच्यामधील काळात विशेष लोकल चालविण्यात याव्यात, जादा तिकीट खिडक्या सुरू कराव्यात, रेल्वेच्या केंद्रीय सूचना प्रसारण केंद्रातर्फे सातत्याने बाबासाहेबांना अभिवादन करण्याच्या उद्घोषणा करण्यात याव्यात, अभिवादनाचे बॅनर मोठ्या प्रमाणात लावण्यात यावेत, अशा विविध मागण्या समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी केल्या आहेत.>अनुयायांना या सुविधा पुरवल्या जाणारमहानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक (कुर्ला) टर्मिनस येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध आहेत.चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे शामियाना व व्ही.आय.पी. कक्षासह नियंत्रण कक्षाची व्यवस्थाराजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्षस्काउट गाइड हॉल येथे भिक्खू निवासाची व्यवस्थामार्गदर्शनाकरिता १०० फूट उंचीचे चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसर येथे निदर्शक फुग्यांची व्यवस्थाभ्रमणध्वनी चार्जिंगकरिता शिवाजी पार्क येथे ३०० पॉइंटची व्यवस्थाफायबरच्या २०० तात्पुरत्या स्नानगृहाची व ६० तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्थाइंदू मिलमागे फायबरच्या तात्पुरत्या ६० शौचालयांची व ६० स्नानगृहांची व्यवस्थारांगेतील अनुयायांसाठी तात्पुरते छत असलेल्या १५० बाकड्यांची व्यवस्थास्नानगृहे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाचैत्यभूमी प्रवेशद्वाराजवळ, सूर्यवंशी सभागृह येथे रुग्णवाहिकेसहीत आरोग्य सेवाशिवाजी पार्क मैदान व परिसरात १८ फिरती शौचालये (१८० शौचकुपे)रांगेत असणाºया अनुयायांसाठी ४ फिरती शौचालये (४० शौचकुपे)पिण्याच्या पाण्याचे १६ टँकर्सचौपाटीवर सुरक्षा रक्षकासहीतबोटीची संपूर्ण परिसरात व्यवस्थामोठया पडद्यांवर थेट प्रक्षेपण४६९ स्टॉल्सची रचना>भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व अनुयायांना नागरी सेवा-सुविधा देण्यासाठी महापालिका सुसज्ज आहे. अनुयायांनी या सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा.- अजय मेहता, आयुक्त,मुंबई महापालिका.