फुकट्या प्रवाशांकडून नऊ महिन्यांत दहा कोटींची दंडवसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:07 AM2021-03-24T04:07:06+5:302021-03-24T04:07:06+5:30
मागील नऊ महिन्यांतील आकडेवारी : मुंबई विभागात तीन लाख जणांचा विनातिकीट प्रवास लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मध्य रेल्वेच्या ...
मागील नऊ महिन्यांतील आकडेवारी : मुंबई विभागात तीन लाख जणांचा विनातिकीट प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने केलेल्या तिकीट तपासणीत विनातिकीट, अनियमित प्रवाशांची तीन लाख प्रकरणे आढळली असून, या फुकट्या प्रवाशांकडून १०.०४ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने १५ जून २०२० ते २१ मार्च २०२१ पर्यंत उपनगरी आणि बाहेरगावच्या रेल्वे गाड्यांमध्ये ही कारवाई केली.
तिकीट तपासणीत विनातिकीट, अनियमित प्रवाशांची ३.०२ लाख प्रकरणे आढळून आली आणि त्यांच्याकडून रुपये १०.०४ कोटी दंड म्हणून वसूल करण्यात आला. यापैकी २.२५ लाख प्रकरणे उपनगरी गाड्यांमध्ये आढळली आहेत. या प्रवाशांकडून दंड म्हणून ६.०२ कोटी रुपये आणि बाहेरगावच्या रेल्वेगाड्यांमधील ७५ हजार प्रकरणांतून रुपये ४.०२ कोटी दंड म्हणून वसूल करण्यात आला.
यावर्षी जानेवारीत विनातिकीट ६५,१४० प्रवाशांकडून मुंबई विभागातून १.९० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. तर, फेब्रुवारीत ७९,२५१ फुकट्या प्रवाशांकडून २.६६ कोटी आणि मार्च २०२१ मध्ये ६२,८७३ प्रवाशांकडून २.४२ कोटी वसूल करण्यात आले. अधिकृत रेल्वे प्रवाशांना सुरक्षित आणि आरामात प्रवास करता यावा यासाठी ही तपासणी करण्यात येत आहे.
...................