Join us

आरोपीला दहा दिवसांची कोठडी

By admin | Published: July 30, 2014 12:27 AM

संतोष शिरसाट याच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या वाहक राजेश सिंग याला दहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

नवी मुंबई :  संतोष शिरसाट याच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या वाहक राजेश सिंग याला दहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. नरबळीच्या उद्देशाने त्याने ही हत्या केली होती का यासंबंधीचा अधिक तपास एपीएमसी पोलिस करीत आहेत. 
शुक्रवारी रात्री अमावस्येच्या पहाटे संतोष शिरसाट या ट्रक चालकाची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी अटक केलेल्या ट्रक वाहक राजेश सिंग याच्याकडे पोलिसांना संशयास्पद वस्तू आढळून आल्या आहेत. जादूटोण्यासाठी वापरले जाणारे साहित्य त्याच्याकडे आढळून आल्याने पोलिसांच्याही तपासात तिढा वाढला आहे. सिंग याला सोमवारी सीबीडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सांगितले. परंतु सिंग याने पूर्णपणो मौन बाळगले असल्याने त्याच्याकडे आढळलेल्या संशयास्पद वस्तूंचा उलगडा पोलिसांना झालेला नाही. त्यामुळे या वस्तूंचे गूढ अद्यापही कायम आहे. सिंग याने संतोष शिरसाट याची हत्या केल्याचा दिवस अमावास्येचा होता. त्यामुळे यामागे नरबळीचा उद्देश आहे का, या अनुषंगाने देखील पोलिस तपास करीत आहेत. 
सिंग हा गेली आठ वर्षे नवी मुंबईत रहात असतानाही त्याच्या राहण्याचे निश्चित ठिकाण नाही. त्यामुळे यापूर्वी त्याने कोणत्या ट्रक चालकाची अशाच प्रकारे हत्या केलेय का यासंबंधीची माहिती मिळवण्याच्या प्रय}ात देखील एपीएमसी पोलिस आहेत. 
(प्रतिनिधी)