दहा महिन्यांत मुंबई विमानतळावर आढळले ३,३१० कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:07 AM2021-09-26T04:07:06+5:302021-09-26T04:07:06+5:30
मुंबई : सर्वात व्यस्त विमानतळांच्या यादीत असलेल्या मुंबई विमानतळावर गेल्या १० महिन्यांत तीन हजार ३१० प्रवासी कोरोना बाधित आढळून ...
मुंबई : सर्वात व्यस्त विमानतळांच्या यादीत असलेल्या मुंबई विमानतळावर गेल्या १० महिन्यांत तीन हजार ३१० प्रवासी कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यात देशांतर्गत प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे.
मुंबई विमानतळावर आता कोरोनाबाबतचे नियम बऱ्याच अंशी शिथिल झाले असले, तरी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या काळात निर्बंधाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. या काळात विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अहवाल सक्तीचा करण्यात आला. तसा अहवाल सादर न करणाऱ्यांची विमानतळावर चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२१ पर्यंत मुंबईत आलेले एकूण तीन हजार ३१० प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे आढळले. त्यात २ हजार १९८ देशांतर्गत आणि १ हजार ११२ आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश आहे.
.....
किती प्रवासी बाधित?
देशांतर्गत
एकूण चाचण्या - २,४१,०२३
बाधित - २,१९८
...
आंतरराष्ट्रीय
एकूण चाचण्या - १,८०,०००
बाधित - १,११२
......
सध्याचा नियम काय?
- लसीकरण पूर्ण झालेल्यांना चाचणीची गरज नाही.
- इतर प्रवाशांना कोरोना चाचणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक.
- परदेशातून आलेल्या प्रत्येकाला विमानतळावर चाचणीची सक्ती.
......
किती पैसे घेतात?
- ६०० रुपये - ८ ते २२ तासांत अहवाल
- ४,५०० रुपये - १३ मिनिटांत अहवाल