Join us

मुंबईत ३ ते ९ डिसेंबरपर्यंत दहा टक्के पाणीकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 2:51 AM

तलावांमधून उचललेल्या पाण्यावर पिसे जलशुद्धिकरण केंद्रात प्रक्रिया करण्यात येते.

मुंबई : पिसे उदंचन केंद्रांमध्ये न्यूमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती येत्या बुधवारपासून महापालिका हाती घेणार आहे. हे काम तब्बल आठवडाभर सुरू राहणार आहे. त्यामुळे ३ ते ९ डिसेंबरपर्यंत संपूर्ण मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे.तलावांमधून उचललेल्या पाण्यावर पिसे जलशुद्धिकरण केंद्रात प्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर, संपूर्ण मुंबईत पाणीपुरवठा केला जातो. या पिसे उदंचन केंद्रांतील न्यूमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबईत दहा टक्के पाणीकपातीसह कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या काळात पाणी साठवून व जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :पाणी