दहा विभाग कोरोनामुक्तीच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:14 AM2021-01-13T04:14:39+5:302021-01-13T04:14:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चेस द वायरस, माझे कुटुंब, माझी जबाबदारी आणि मिशन झिरो अशा कोरोनाविरोधात सुरू असलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चेस द वायरस, माझे कुटुंब, माझी जबाबदारी आणि मिशन झिरो अशा कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लढायांना अखेर यश आले आहे. नवीन वर्षात कोरोनाचा संसर्ग मुंबईत पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. सध्या केवळ सात हजार ३६४ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर ०.१९ टक्के आहे. तब्बल दहा विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर यापेक्षा कमी आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोनाचा प्रसार वाढलेल्या मुलुंड विभागातही आता २३४ दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. तर भुलेश्वर, चिराबाजार या सी विभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सर्वाधिक म्हणजे ७९५ दिवस इतका आहे.
कोरोनामुक्त झालेले रुग्ण - २७९८८२
सक्रिय रुग्ण - ७३६४
मृत्यू - १११९५
एकूण चाचणी - २५०४९७१
एकूण बाधित - ११.९३ टक्के
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण - ९४ टक्के
मृत्यूचे प्रमाण - चार टक्के
रुग्णवाढीचा सरासरी दर ०.१९ टक्के
तालुकानिहाय सक्रिय रुग्ण
बी - डोंगरी - ५३
सी - भुलेश्वर - ९६
एम पूर्व - गोवंडी, मानखुर्द - २२४
आर उत्तर - दहिसर - २२६
एच पूर्व - वांद्रे पूर्व - २३९
इ - भायखळा, नागपाडा - २४१
जी दक्षिण - वरळी, प्रभादेवी - २५५
एफ दक्षिण - परळ, एल्फिन्स्टन - २६६
जी उत्तर - धारावी, दादर - ३४७
आर मध्य - बोरीवली - ५२५८
* संसर्ग रोखण्यासाठी पालिकेचे प्रयत्न
हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी, भायखळा, वरळी, वांद्रे, बोरीवली या विभागात प्रसार नियंत्रणात आला असल्याने हे विभाग कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहेत. यापैकी धारावी, वरळी, वांद्रे आणि बोरीवली येथील झोपडपट्ट्यांमधील संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेला अथक प्रयत्न करावे लागले.