Join us  

दहा हजार बेरोजगारांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2016 2:25 AM

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर व पालघर जिल्हयाच्या जिल्हा कौशल्य विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी

बोईसर :जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर व पालघर जिल्हयाच्या जिल्हा कौशल्य विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी तारापूर एमआयडीसीमध्ये आयोजित केलेल्या रोजगार मेळावा व कौशल्य विकास प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिरामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे दहा हजार बेरोजगार तरूण-तरूणी उपस्थित होते.राज्याचे आदिवासी विकास व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, खासदार चिंतामण वनगा, आमदार विलास तरे, कौशल्य विभगाचे प्रधान सचिव दीपक कुमार, आयुक्त विजय वाघमारे, कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी व उद्योजक रोजगार मेळाव्यात उपस्थित होते.मेळाव्याच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी बांगर यांनी सुरूवातील प्रस्तावना करताना ८५ टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या पालघर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात स्कील्ड मॅन पॉवरची मागणी जास्त आह.े बेरोजगार तरूणांना योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. दोन कंपन्यांबरोबर एमओयू ही करण्यात आला असून तेथे सुमारे ४३६० रोजगार मिळणार आहेत, तर टप्प्याटप्प्याने सर्वांना नोकरी देण्यात येणार असल्याचे सांगितले पालकमंत्री विष्णू सवरा यांनी जिल्ह्यातील बेरोजगारांकडे आवश्यक असलेले स्कील्ड नसल्याचे ते नोकरीपासून वंचित रहावे लागते. या उपक्रमातून बेरोजगारी कमी होऊ शकते. आज प्रचंड संख्येने आलेले बेरोजगार पाहता बेरोजगारांची भीषणता समजते, परंतु चांगल्या पर्वास कामाला सुरूवात झाली असे त्यांनी सांगितले.स्वाधान क्षत्रिय यांनी येथे जमलेल्या हजारो बेरोजगारांच्या उपस्थितीत सांगितले की, फार तरूणांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षणाची गरज आहे. आज येथे आलो नसतो तर मंत्रालयात बसून बेरोजगारीची कल्पना आली नसती. आज येथे उपस्थित असलेल्या सर्व बेरोजगारांची नोंदणी करून प्रत्येकांना पत्र पाठवून तरूण-तरूणी ज्या विभागाची पसंती दर्शवतील, त्या क्षेत्रात त्यांना प्रशिक्षण देण्यात येऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)