तुमच्या घरात भाडेकरु राहतात की चोर? भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्याला देण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 10:09 AM2023-12-16T10:09:45+5:302023-12-16T10:10:43+5:30

भाडेकरू नोंदणीच्या नावाखाली अनेकदा मध्यस्थी किंवा दलालांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी मुंबईत वाढत आहे. 

Tenants live in your house or thieves, robbers give all updates to mumbai police | तुमच्या घरात भाडेकरु राहतात की चोर? भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्याला देण्याचे आवाहन

तुमच्या घरात भाडेकरु राहतात की चोर? भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्याला देण्याचे आवाहन

मुंबई : जास्तीच्या पैशांसाठी अनेकजण भाडेकरूंची माहिती पोलिसांना देत नाही. त्यामुळे घुसखोरांबरोबर चोरट्यांचेही फावते. त्यामुळे आपल्या भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्याला देण्याचे आवाहन वेळोवेळी पोलिसांकडून करण्यात येत आहे. 
गेल्या काही दिवसांत बांगलादेशी विरोधातील कारवाई वाढत आहे. ही मंडळी बनावट कागदपत्रांद्वारे वास्तव्य करत असल्याचे समोर आले. घरमालकही अधिक माहिती घेण्याकडे टाळाटाळ करतात. दुसरीकडे भाडेकरू नोंदणीच्या नावाखाली अनेकदा मध्यस्थी किंवा दलालांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी मुंबईत वाढत आहे. 

माहितीची खात्री करा :

येथे पुरविलेली माहिती सत्य असल्याबाबत जागा, घरमालक आणि भाडेकरूने खात्री करावी असेही पोलिसांनी नमूद केले. 

 पोलिसांना खोटी माहिती पुरविणे गुन्हा असून त्यानुसार, अर्जामधील माहिती मध्ये तफावत आढळल्यास संबंधित अर्जदारावर, तसेच घरमालकावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते असे पोलीस प्रवक्ते प्रशांत कदम यांनी नमूद केले आहे.

 नागरिकांनी दलालांच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

हीच बाब लक्षात घेत विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी जानेवारी महिन्यात 
भाडेकरू ठेवताना पोलिसांच्या ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे आदेश जारी केले आहेत. 

सूचनेनुसार, पोलिसांच्या संकेतस्थळावर भाडेकरू नोंदणी संदर्भात बदल करण्यात आले आहे. नागरिक घर, जागा भाड्याने देण्याची माहिती मुंबई पोलिसांना ऑनलाइन अर्ज, प्रत्यक्ष संबंधित पोलिस ठाण्यास अर्ज किंवा पोस्टाद्वारे अर्ज पाठवून करू शकतात. 

मुंबई पोलिसांच्या हद्दीमधील घर, जागा भाड्याने देण्याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना देण्याकरिता नागरिकांना ही ऑनलाइन सेवा देण्यात आली आहे.
 
ओटीपी हा घरमालकाच्या संपर्क क्रमांकावर पाठविला जाईल. घरमालकाचा पत्ता व भाडेतत्त्वावर दिलेल्या मालमत्तेचा पत्ता हा एकच देऊ नये. 

Web Title: Tenants live in your house or thieves, robbers give all updates to mumbai police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.