Join us

भाडेकरू हस्तांतरण होणार सोपे

By admin | Published: October 11, 2015 4:46 AM

महापालिकेच्या मालमत्ता खात्याच्या अखत्यारीतील घराच्या भाडेकरू हस्तांतरण प्रक्रियेबाबत संबंधित अर्ज नमुन्यांच्या सुलभीकरणाची व कालमर्यादा निश्चित करण्याची कार्यवाही

मुंबई : महापालिकेच्या मालमत्ता खात्याच्या अखत्यारीतील घराच्या भाडेकरू हस्तांतरण प्रक्रियेबाबत संबंधित अर्ज नमुन्यांच्या सुलभीकरणाची व कालमर्यादा निश्चित करण्याची कार्यवाही मालमत्ता खात्याच्या स्तरावर सुरू असून, त्यामुळे आता मालमत्ता भाडेकरू हस्तांतरण सोपे होणार आहे.एफ/दक्षिण विभाग कार्यालयातील मालमत्ता खात्याच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही महिन्यांपूर्वी या प्रकरणी लाच घेताना पकडले होते. विभाग स्तरावरील संबंधित अर्ज नमुन्यांचे निश्चित स्वरूप नसणे व अर्ज केल्यानंतर संबंधित प्रक्रिया किती दिवसांत व्हावी, याबाबत निश्चित कालमर्यादा नसल्याचा फायदा काही असामाजिक घटक घेत होते. ही बाब लक्षात घेऊन ही कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. २६ आॅक्टोबरपर्यंत मर्यादाकार्यवाहीबाबतच्या अर्जांचे मसुदे व कालमर्यादा तपशील महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबाबत नागरिकांनी त्यांच्या सूचना २६ आॅक्टोबरपर्यंत कळवाव्यात.