मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या काही परीक्षांमुळे यंदा बारावीनंतर पारंपरिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कला वाढेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवी प्रवेशासाठी आवश्यक असणारी एमएचटी-सीईटी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर टाकण्यात आली आहे. मात्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून त्यासंदर्भात पुन्हा काहीच माहिती किंवा सूचना जाहीर करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे यंदा सीईटी परीक्षा होईल की नाही, असा संभ्रम आहे.
जेईई नीटसारख्या देशपातळीवरील परीक्षांच्या वेळापत्रकानुसार या परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार असल्याने सध्या विज्ञान शाखेतून पुढे पदवीसाठी प्रवेश घेणाऱ्यांकडे वाट पाहण्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही. यामुळे पारंपरिक (अव्यावसायिक) अभ्यासक्रमांना जास्त पसंती मिळेल, अशी शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली.
सीईटी सेलच्या वतीने राज्यातील अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी ५ लाख २४ हजार ९०७ विद्यार्थांनी नोंदणी केली आहे. या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने अद्याप जाहीर झाल्या नाहीत.
याउलट अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना येत्या काही दिवसांत आॅनलाइन पद्धतीने सुरुवात होऊ शकते. मुंबई विद्यापीठाकडून तर प्रवेशपूर्व नोंदणीसाठीही सुरुवात झाली आहे. त्यामुळे जे विद्यार्थी सप्टेंबरपर्यंत प्रवेशाची वाट पाहणार नाहीत त्यांचा ओढा पारंपरिक अभ्यासक्रमाकडे जाण्याची शक्यता आहे.एफवाय प्रवेशासाठी मोठी चुरसमुंबई विभागात नव्वदी पार केलेल्या विद्यार्थ्यांची तीन हजारावर असलेली संख्या त्याचबरोबर सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रातील विद्यार्थ्यांना ९५ आणि ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाºया विद्यार्थ्यांची संख्या यंदा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे एफवाय प्रवेशासाठी नामवंत महाविद्यालयात यंदा चुरस वाढण्याची चिन्हे आहेत.७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्याही मुंबईत जास्त असून मुंबईत तब्बल ४३ हजार ३७० विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. यामुळे वाणिज्य शाखेसाठीही प्रवेशाची मोठी चुरस होण्याची शक्यता आहे.