४७ वातानुकूलित लोकलची निविदा प्रक्रिया सुरू, चेन्नईत बांधणार १२ डब्यांची वातानुकूलित लोकल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 07:06 AM2018-09-29T07:06:54+5:302018-09-29T07:07:07+5:30

उपनगरीय लोकल प्रवाशांचा भविष्यकाळातील प्रवास आरामदायी आणि गारेगार बनवण्यासाठी ४७ वातानुकूलित लोकलची निविदा क्रिया सुरू करण्यात आली आहे.

 Tender process for 47 air conditioned locales will be started, 12 air conditioned locals built in Chennai | ४७ वातानुकूलित लोकलची निविदा प्रक्रिया सुरू, चेन्नईत बांधणार १२ डब्यांची वातानुकूलित लोकल

४७ वातानुकूलित लोकलची निविदा प्रक्रिया सुरू, चेन्नईत बांधणार १२ डब्यांची वातानुकूलित लोकल

Next

मुंबई : उपनगरीय लोकल प्रवाशांचा भविष्यकाळातील प्रवास आरामदायी आणि गारेगार बनवण्यासाठी ४७ वातानुकूलित लोकलची निविदा क्रिया सुरू करण्यात आली आहे. मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प ३ अंतर्गत असलेल्या या वातानुकूलित लोकलची बांधणी चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) करणार असून याची देखभाल मुंबई रेल्वे विकास महामंडळ करेल.
चेन्नई येथील आयसीएफ वातानुकूलित लोकलची बांधणी करणार आहे. ३ हजार ४९१ कोटींच्या वातानुकूलित लोकल प्रकल्पांसाठी शुक्रवारी निविदा मागवण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयातील सचिव नरेंद्र पाटील यांनी सांगितले. वातानुकूलित लोकलच्याविदा नोव्हेंबर महिन्यात उघडल्या जाणार असून २०१९-२०२० मध्ये १२ डब्यांच्या चार संपूर्ण वातानुकूलित लोकल मुंबईत दाखल होतील. उर्वरित लोकल टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. वातानुकूलित लोकल मध्य मार्गावर की पश्चिम मार्गावर धावणार याचा निर्णय रेल्वे बोर्ड घेईल. वातानुकूलित लोकल प्रकल्पांसाठी इंडियन रेल्वे फायनान्स
कॉर्पोरेशनकडून निधी उपलब्ध होणार आहे. आयसीएफमध्ये लोकलची बांधणी होणार असून देखभाल आणि दुरु स्ती एमआरव्हीसी करणार आहे.
एमयूटीपी ३ अ च्या मंजुरीसाठी येत्या पंधरवड्यात राज्याकडून मंजुरी अपेक्षित आहे.

रेल्वेमंत्र्यांनी केली कानउघडणी

मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प २ मधील ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या विलंबामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई रेल्वे
विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि मध्य रेल्वेची कानउघाडणी केली आहे. मध्य रेल्वे आणि एमआरव्हीसी यांनी आपआपसांत समन्वय साधावा. हा प्रकल्प रखडल्याने लोकलसह एक्स्प्रेस वेळापत्रकांवर परिणाम होत असल्याने कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प तातडीने पूर्ण करावा, असे आदेश रेल्वेमंत्र्यांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

Web Title:  Tender process for 47 air conditioned locales will be started, 12 air conditioned locals built in Chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.