Join us

मुंबई महापालिकेत टेंडर घोटाळे, मुंबई वंचितचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 9:07 PM

हे सगळे मुद्दे घेऊन मुंबई आयुक्त इकबाल चहल आणि इतर अधिकारी यांच्याकडे आम्ही गेलो. मात्र ते साधे ऐकायला तयार नाहीत. मागील चार महिन्या पासून हे फिरवा फिरवीची उत्तरे देत आहेत असेही संघटक मनोज मर्चंडे यांनी सांगितले. 

- श्रीकांत जाधव

मुंबई :  मुंबई महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगमताने टेंडरचे मोठमोठे घोटाळे सुरू आहेत. वारंवार याची माहिती महापालिका उच्च अधिकाऱ्यांच्या कानावर आम्ही घातली आहे. मात्र, हे अधिकारी जाणूनबुजून आमचे ऐकून घेत नाहीत, आम्हाला वेळ देत नाहीत, फिरवा फिरवीची उत्तरे देतात, असे आरोप वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशने महापालिका आयुक्तांवर केले आहे.

मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन खान, संघटक मनोज मर्चंडे, महिला अध्यक्ष सुनीता गायकवाड, आनंद जाधव, चेतन आहिरे  यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबई महापालिकेत टेंडरचे आरक्षण चलाखीने हटवण्यात येते. मोठे घोळ करून टेंडर घोटाळा केला जातो. त्यामुळे सामाजिक संस्था, बेरोजगार संस्था बाधित होत आहेत. 

कॉर्पोरेट असलेल्या लोकांना मागच्या दाराने इन्ट्री देऊन प्रायव्हेट सेक्टरला फायदा देण्यासाठी पालिका आयुक्त इकबाल चहल यांचा नेहमी प्रयत्न दिसत असतो. पे पार्किंगमध्ये सुद्धा अनेक घोटाळे आहेत. त्यामुळे महिला बचत गट व बेरोजगर संघटना बाधित होत आहेत. स्क्रॅप पाईप लाईन टेंडरमध्ये अचानक नियम बदल करून ४९ कंत्राटदार बाधित करून एकालाच फायदा पोहचवला आहे. ज्यामुळे कमीत कमी पालिकेचे १५ ते २० करोडचे नुकसान होत आहे. हे सर्व जाणूनबुजून केले जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशने महापालिकेवर केला आहे. 

हे सगळे मुद्दे घेऊन मुंबई आयुक्त इकबाल चहल आणि इतर अधिकारी यांच्याकडे आम्ही गेलो. मात्र ते साधे ऐकायला तयार नाहीत. मागील चार महिन्या पासून हे फिरवा फिरवीची उत्तरे देत आहेत असेही संघटक मनोज मर्चंडे यांनी सांगितले.  

टॅग्स :वंचित बहुजन आघाडीमुंबई महानगरपालिका