Join us

सचिनच्या कटआऊटला काळ्या तेलाची अंघोळ, फडणवीसांनी व्यक्त केला संताप

By महेश गलांडे | Published: February 06, 2021 8:44 AM

सोशल मीडियावर जणू सचिनविरोधी वातावरण झाले होते. त्यात मराठमोळा दिग्दर्शन समीर विध्वंस ( Sameer Vidwans) यांनीही सचिनच्या ट्विटवर नाराजी प्रकट करताना परखड मत मांडले.

ठळक मुद्देसोशल मीडियावर जणू सचिनविरोधी वातावरण झाले होते. त्यात मराठमोळा दिग्दर्शन समीर विध्वंस ( Sameer Vidwans) यांनीही सचिनच्या ट्विटवर नाराजी प्रकट करताना परखड मत मांडले.

मुंबई - मास्टरब्लास्ट भारतरत्न आणि महाराष्ट्रपुत्र क्रिकेटर सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) यानं पोस्ट केलेल्या #IndiaTogether & #IndiaAgainstPropaganda या ट्विटनंतर नेटिझन्स चांगलेच खवळले आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला अनुसरुन पॉप स्टार गायिका रिहाना हिने केलेल्या ट्विटला अप्रत्यक्षपणे उत्तरच सचिनने आपल्या ट्टिटमधून दिलं होत. त्यानंतर, इतरही दिग्गज क्रिकेटर्सं आणि सेलिब्रिटींनी इंडिया टुगेदर म्हणत सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले. त्यानंतर, सचिनला ट्विटरवर ट्रोल करण्यात आलंय. विशेष म्हणजे केरळमधील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिनच्या पोस्टरला काळे तेल वाहून त्याचा निषेध नोंदवला. त्यामुळे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारला आहे. 

सचिन तेंडुलकरने 3 फेब्रुवारीला देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वता याबद्दल ट्विट केलं होत. ते 1 लाख 8 हजार जणांनी रिट्विट केलं, तर 67 हजार लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या. सोशल मीडियावर जणू सचिनविरोधी वातावरण झाले होते. त्यात मराठमोळा दिग्दर्शन समीर विध्वंस ( Sameer Vidwans) यांनीही सचिनच्या ट्विटवर नाराजी प्रकट करताना परखड मत मांडले. तर, केरळमधील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या लाकडी कटआऊटला काळ्या ऑईलने अंघोळ घालून सचिनच्या ट्विटचा निषेध नोंदवला. केरळमधील कोची येथे हा प्रकार घडला होता. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी भूमिपुत्राचा, महाराष्ट्र भूषण आणि देशाचं भूषण असलेल्या सचिनचा हा अवमान सहन करणार का? असा प्रश्नही फडणवीस यांनी विचारला आहे. 

सचिन तेंडुलकरचं ट्विट

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना ( Rihanna) हिनं शेतकरी आंदोलनाबाबद ट्विट केल्यानंतर तिला भारतीयांच्या रोषाचा सामना करावा लागला. सचिननं केलेलं ट्विट हे रिहानाला अप्रत्यक्ष सुनावणारे होते. ''भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगले ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा,''असं ट्विट सचिननं केलं होतं.  

समीर विध्वंस यांची टीका

"सचिनची बॅटींग बघत लहानाचा मोठा झालो! तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता! आयुष्यात अनेक निराश क्षणी मी त्याच्या इनिंग्ज बघायचो, खूप बरं वाटायचं. त्याच्या अनेक गोष्टी मनाला पटल्या नाहीत पण हे कधी बदललं नव्हतं. पण आता मात्र इथून पुढे सगळं वेगळं असेल. राग येतोचे पण वाईट जास्त वाटतंय!" असं ट्विट समीर विध्वंस यांनी केलं आहे.   

टॅग्स :देवेंद्र फडणवीससचिन तेंडुलकरशेतकरी आंदोलनदिल्ली