Join us  

दहावी निकालाचा तणाव; उत्सुकता शिगेला

By admin | Published: June 17, 2014 2:04 AM

शाळेच्या चार भिंती ओलांडून ‘दुनियादारी’ करण्यास सज्ज असणाऱ्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता अधिक आहे.

मुंबई : शाळेच्या चार भिंती ओलांडून ‘दुनियादारी’ करण्यास सज्ज असणाऱ्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता अधिक आहे. मात्र एका बाजूला ‘करिअर’ प्लानिंग सुरू असताना दुसऱ्या बाजूला ‘कट्टा’ प्लानिंगही जोरदार सुरू आहे. कॉलेज, कॅन्टीन, फ्रेंड्स आणि कट्टा याविषयी फक्त ‘ऐकून’ असणारी ही मंडळी कॉलेजविश्वाबद्दल एक्साइट आहे. या सगळ्या गडबडीत करिअरविषयी फोकस असणाऱ्या या विद्यार्थ्यांनी करिअरलाच पहिली पसंती दर्शविली आहे. करिअरचा मार्ग मोकळा झाला की, मग बाकी धम्माल-मस्ती करण्यासाठी वेळ आहेच, असा या विद्यार्थ्यांचा फंडा आहे. त्यामुळे अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या निकालाचे काहीसे ‘टेन्शन’ कॅरी करत पालक, प्रोफेसर, फ्रेंड्स अशा सगळ्यांचे करिअरबाबत ‘सिरिअस’ डिस्कशन सुरू आहे.