मुंबई : दहावी-बारावीच्या फेरपरीक्षांसंदर्भात अद्याप कोणत्याही प्रकारचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. दरम्यान राज्यातील कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पाहता ते यथावकाश जाहीर केले जाणार असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.राज्य मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या पुनर्परीक्षा सर्वसाधारण स्थितीत आॅक्टोबरमध्ये घेतल्या जातात. परंतु यंदा राज्यावर कोरोनाचे सावट असल्याने या परीक्षा नोव्हेंबर किंवा कदाचित डिसेंबरपर्यंतही लांबणीवर पडतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मंडळातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.दरवर्षी दहावी आणि बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तत्काळ फेरपरीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी गेल्या काही वर्षांपासून मिळत होती. फेरपरीक्षांच्या निर्णयानुसार दहावी, बारावीचा निकाल साधारणपणे मे महिन्यात जाहीर झाल्यानंतर तत्काळ जुलै-आॅगस्टमध्ये फेरपरीक्षा घेतली जात होती, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात नव्हते. परंतु, यंदा परीक्षांचे निकालच मुळात जुलैमध्ये लागल्याने या फेरपरीक्षाही झाल्या नाहीत. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष वाचवण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी पालक फेरपरीक्षांची वाट पाहत आहेत.सध्यस्थितीत सर्व प्रकारच्या शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला हानी होईल असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. याचमुळे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या श्रेणीसुधार तसेच पुनर्परीक्षा आॅक्टोबरमध्ये होणार नाहीत. राज्यातील कोविड - १९ स्थिती पाहता या परीक्षा आता दिवाळीनंतरच होणार अशी महिती शालेय शिक्षणमंत्री शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना दिली होती.सीईटी १ ते १५ आॅक्टोबरदरम्यान - उदय सामंतएमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षांचे आयोजन १ ते १५ आॅक्टोबरदरम्यान केले जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाईल. अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या नियोजनाचा प्रश्न सुटला की सीईटी सेल प्राधिकरणाने केलेल्या तयारीचा आढावा घेऊन परीक्षा पद्धती कशी असेल याबाबतही निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.राज्यात इंजिनीअरिंग, फार्मसी, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, बीएड अशा अनेक अभ्यासक्रमांची सीईटी होणे बाकी आहे. त्यासाठी तब्बल ५ लाख ३२ हजार ३६१ विर्थ्यांनी अर्ज केले आहेत. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हास्तरावर; तसेच तालुकास्तरावर सीईटी परीक्षा घेण्याबाबत उच्चशिक्षण संचालनालयाचे संचालक आणि अधिकाºयांनी चाचपणी केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत यावर निर्णय घेत सीईटीबाबत घोषणा करता येईल, असे सामंत यांनी सांगितले.सीईटी परीक्षा नोंदणी केलेले विद्यार्थी : एमएचटी-सीईटी ५,३२,३६१, विधी (पाच वर्षांचा अभ्यासक्रम) २३,९८७, विधि (तीन वर्षांचा अभ्यासक्रम) ४३,१७१, बीएड ५५,५५७, बीपीएड ७,०४६, एमपीएड १,८५९, बीएबीएड, बीएससी बीएड (एकात्मिक) २,४७५, बीएड-एमएड (एकात्मिक) १,६७९, बीएचएमसीटी २,४७५, एमएचएमसीटी २७,एकूण ६,९२,६९८
दहावी-बारावीच्या फेरपरीक्षा यथावकाश जाहीर होणार, फेरपरीक्षांबाबत निर्णय नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 4:46 AM